Saturday 30 May 2020

गरोदर महिलेच्या मदतीला धावले - आयुक्त डॉ विजय सुर्यवंशी !

गरोदर महिलेच्या मदतीला धावले - आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी



कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका पालिका क्षेत्रातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या गरोदर महिलेचा प्रसुती चा सपूर्ण खर्च उचला कडोमपा आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी लॉक डाऊन काळात कचोरे प्रभागातील महिला प्रसुती साठी कळवा हॉस्पिटलमध्ये येते गेली असता कळवा रुग्णायलाय तिची प्रसुती केली नाही त्यामुळे महिलेला कळवा ते कल्याण पर्यत चालत यावं लागलं याची माहिती स्वराष्ट्र माझा न्युज चॅनल चे संपादक अंबादास (आदर्श) भालेराव यांनी आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांना दिली असता तत्काळ आयुक्तांनी कल्याण कचोरे प्रभाग 45 मध्ये राहणारी महिलेची दखल घेत डॉ प्रशांत पाटील याच्याशी संपर्क केला त्याच्या मदतीने कल्याण पश्चिम येतील खाजगी वैष्णवी हॉस्पिटलमध्ये रुग्ण सबा शेख याची प्रसुती ( सिजर ) दिनांक 30 मे 2020 रोजी मोफत केलं. वैष्णवी हॉस्पिटल चे डॉक्टर यांनी महिला लॉक डाऊन काळात मोफत उपचार देऊन माणुकीच धर्म पार पाडला आहे. उपचार दरमन्यात सोनवणे ग्रुप चे संचालक अमित सोनवणे यांनी ही महिलेला उपचारा साठी मदत केली होती.
यामध्ये त्याच्या परिसरातील राहणारे श्रमिक पत्रकार संघाचे महिला अध्यक्ष सुवर्णा कानवडे यांनी महिले ला सकाळी 6 च्या सुमारास दाखल केले असता 8 च्या दरमन्या गरोदर महिलेने एक मुलीला जन्म दिला. सुवर्णा कानवडे यांनी योग्य वेळी मदत करून उपचारासाठी मदत केली महिलेचे नातेवाईक पती हे लॉक डाऊन मुळे गावी अडकल्याने महिला उपचार दरमन्या सोबत कोणी नव्हते त्याकरिता माणुसकी धर्म म्हणून सुवर्णा कानवडे याने पुढाकार घेतला.


लॉक डाऊन काळात दुर्बल घटकातील गरोदर महिला कोणतेही हानी होऊ नये व रुख्मिनी व शास्त्री नगर रुग्णालयात ICU व NICU सेवा नसल्यामुळे मा आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी महिलेचा पूर्ण उपचार खाजगी रुग्णालयात केला आहे.
कल्याण तालुक्यातील खाजगी रुग्णालयाची अवस्था पाहून तत्काळ रुख्मिनी व शास्त्री नगर हॉस्पिटलमध्ये ICU ,NICU सेवा सुरू करण्याचे आदेश मा आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत

कल्याण शहरात आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी याच्या कार्यकीर्ती मध्ये स्वराष्ट्र माझा च्या पाठपुरावा मूळे शासकीय रुग्णालयात रुख्मिनी व शास्त्री नगर रुग्णालयात लवकर ICU, NICU सुविधा सुरू होणार.
आता कल्याण मधील रुग्णांना मुबई कडे किंवा खाजगी रुग्णालयात उपचारासाठी धाव घेण्याची वेळ येणार नाही.
स्वराष्ट्र माझा न्युज चॅनल च्या पाठपुरावा मूळे पालिका क्षेत्रात वेळेवर एक आई व बाळाचा जीव वाचविल्या मूळे आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी कर्तव्य निष्ठ असल्याचे सिद्ध केले.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...