Monday, 22 June 2020

समाजाचे ऋण फेडण्यासाठी मुरबाड तालुक्यातील डॉक्टर इंजिनिअर तरुणाई सरसावली.!

समाजाचे ऋण फेडण्यासाठी मुरबाड तालुक्यातील डॉक्टर इंजिनिअर तरुणाई सरसावली.!

मुरबाड {  मंगल डोंगरे  } कोरोना मुळे अनपेक्षित पणे घ्याव्या लागलेल्या सुट्टीचा केवळ मौज मजे साठी वापर न करता ही वेळ आपण समाजासाठी काही तरी करण्यासाठी खर्च करावी या उद्देशाने    
मुंबई पुणे सारख्या शहरात राहणाऱ्या  मुरबाड तालुक्यातील इंजीनियर तरुणांनी स्थानिक डॉक्टरांच्या सोबत मिळुन एक स्तुत्य उपक्रम चालू केला आहे
      मुरबाड तालुक्यातील ग्रामीण भागात आर्सेनिक अल्बम औषधाचे वाटप , वृक्षारोपण , जनजागृती याच बरोबर विद्यार्थ्यांना मोफत करीयर मार्गदर्शन ,उच्च शिक्षणा साठी लागणारे मार्गदर्शन ,नोकरी साठी द्यायचा इंटरव्हयू बाबत मार्गदर्शन असे विविध उपक्रम हाती घेतले आहेत
     मार्च महिन्या पासुन सुरु असलेल्या कोरोना रोगाच्या साथी मुळे मुंबई पुणे या महानगरातील ऑफिस बंद आहेत.त्यामुळे तेथे वास्तव्यास असलेल्या तालुक्यातील अनेक इंजीनियर तरुण सध्या मुरबाड तालुक्यातील त्यांच्या मुळ गावी परतलेले आहेत.
   अनपेक्षित पणे घ्याव्या लागलेल्या सुट्टीचा केवळ मौज मजे साठी वापर न करता या तरुणांनी मुरबाड डॉक्टर इंजीनियर क्लब स्थापन केला असुन या मध्ये केवळ तालुक्यातील वास्तव्य असलेले व मूरबाड़ तालुक्यात ज्यांचे मुळ गाव आहे अशाच इंजीनियर अणि डॉक्टर यांचा समवेश आहे.
       शुक्रवार ता 19 जून रोजी या क्लब मार्फत गोरखगड येथे आर्सेनिक अल्बम  30 या औषधाचे वाटप व वृक्षारोपणाचा कार्यक्रम शारीरिक अंतर ठेवून पार पडला .
    मागिल एक महिन्या पासुन या क्लब  मार्फत तालुक्यातील अत्यावश्यक सेवा देणाऱ्या  अन्गिशमाक दल , महा वितरणचे कर्मचारी ,  सफाई कर्मचारी तसेच तालुक्यातील सुमारे 1300 कुटुंबांना कोरोना साथी मध्ये रोग प्रतिकार शक्ति वाढविणाऱ्या आर्सेनिक अल्बम औषधाचे वाटप स्वखर्चाने केले आहे. तालुक्यातील विविध गावा मध्ये औषध वाटप करताना कोरोना आजारा बद्दल जनजागृती आणि घ्यायची काळजी या बाबत क्लब मधिल डॉक्टर मार्गदर्शन करत आहेत.
       या पुढे क्लब मार्फत वृक्ष रोपण, गावोगावी विद्यार्थ्यांना मोफत करीयर मार्गदर्शन ,उच्च शिक्षणा साठी लागणारे मार्गदर्शन ,नोकरी साठी द्यायचा इंटरव्हयू बाबत मार्गदर्शन असे विविध उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती संपर्क प्रमुख तुषार कथोरे व डॉ योगेश बांगर यांनी दिली.
   या कार्यात मुरबाड तालुक्यातील जास्तीत जास्त तरुणांनी सहभागी व्हावे तसेच अधिक माहिती साठी इंजिनिअर तुषार कथोरे मोबाईल  7021631848 यांच्या बरोबर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे
      सर्व क्षेत्रात आपली छाप पाडणाऱ्या तालुक्यातील तरुणींचा देखील या क्लब मध्ये सहभाग असुन महिला प्रतिनिधी म्हणून डॉ मयुरी सुरोशे आणि इंजिनिअर शामली जाधव या जोमाने कार्य करत आहेत.
विशेष  म्हणजे क्लब मार्फत खेवारे गावात अर्सेनिक अल्बम 30 या औषधाच्या वाटपच्या पहिल्या कार्यक्रमाची पुर्ण धुरा या महिलानीच पार पाडली.

No comments:

Post a Comment

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !!

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !! ** नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील वाह...