Monday, 22 June 2020

रस्त्याच्या कामासाठी ठेकेदाराने केला शासनाचा दहा लाखाचा बंधारा जमीनदोस्त !! "प्रहार संघटनेने केली फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी "

रस्त्याच्या कामासाठी ठेकेदाराने केला शासनाचा दहा लाखाचा बंधारा  जमीनदोस्त !!
"प्रहार संघटनेने केली फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी "


मुरबाड (मंगल डोंगरे ) रस्त्याच्या कामात बंधाऱ्याच्या पाण्याच्या प्रवाहाचा अडथळा येतो म्हणून चक्क  ठेकेदाराने बेकायदेशीरपणे  हा शासनाने बांधलेला बंधाराच जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केला आहे.याबाबत प्रहार संघटनेने ठाणे जिल्हा परिषदकडे तक्रार करून या ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.


मुरबाड तालुक्यात गेल्या सहा महिण्यां पासून अँन्युटी हायब्रीड या कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत रस्त्याची कामे सुरू आहेत.यातील रस्त्यांपैकी म्हसा - धसई रस्त्याचे काम सध्या सुरू आहे.या रस्त्यालगत गोरखगड येथे तूळई, देहरी, तळेखल, देशमुख पाडा, उचले येथील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी नैसर्गिक नाल्यावर जिल्हा परिषदच्या लघुपाटबंधारे विभागाकडून 9 लाख, 49 हजार, 722 रुपये खर्चून सिमेंटचा के.टी.बंधारा बांधण्यात आला आहे.
मात्र ह्या बंधाऱ्याच्या पाण्याचा रस्त्याचे काम करतांना अडथळा येतो म्हणून मुजोर ठेकेदाने हा बंधाराच जेसीबीने उखडला आहे.
सदर बाबतीत ठेकेदाराने स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन,पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा लघुपाटबंधारे विभागाकडून कोणतीही परवानगी घेतली नसल्याचा आरोप करत प्रहारचे संघटनेचे  तालुका अध्यक्ष शरद पाटील यांनी तक्रार करून ठेकेदारावर फौजदारी गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे.

No comments:

Post a Comment

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !!

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !! ** नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील वाह...