मानिवली ग्रामपंचायतीच्या उपसरपंच विरुद्ध अविश्वास ठराव मंजूर, लाॅकडाऊणच्या काळात सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा ठपका!
कल्याण (संजय कांबळे) कल्याण तालुक्यातील मानिवली ग्रामपंचायतीचे उपसरपंच जगदीश कान्हा गायकर यांनी इतर सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने कारभार केला इतकेच नव्हे तर लाॅकडाऊण काळात सॅनिटायझर व मास्क ची खरेदी केली. यावेळी देखील सदस्यांना विश्वासात घेतले नाही आणि सरकारी निधीचा गैरवापर केला असे अनेक ठपके ठेवून अविश्वास ठराव दाखल केला आणि एक विरुद्ध तीन मतांनी तो संमत झाला.
मानिवली ग्रामपंचायतची स्थापना 1962 मध्ये झाली. एकुण 9 सदस्य असलेल्या या पैकी 5 सदस्याचे पद या अगोदरच न्यायालयाने रद्द ठरवले आहे. त्यामुळे आता केवळ चार सदस्य आहेत यामध्ये श्रीमती सुनीता सुनील गायकर, युंगधरा अशोक गायकर, अलका गुरुनाथ गायकर आणि जगदीश कान्हा गायकर यांचा समावेश असून सरपंच युंगधरा अशोक गायकर यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने त्यांचे पद आॅक्टोबर 2019 रोजी रिक्त झाले होते. त्यामुळे उपसरपंच जगदीश गायकर यांच्या कडे प्रभारी सरपंच पदाचा चार्ज आला होता. परंतू त्यांनी या पदाचा गैरवापर केला. यामुळे त्याचेवर अविश्वास प्रस्ताव दाखल केला. यामध्ये उपसरपंच हे मासिक सभेत चर्चा न झालेल्या विषय इतिवृत्तात सामिल करने, मासिक सभेचे इतिवृत्त 7दिवसात सदस्याना न देणे, प्रभारी सरपंच म्हणून नेमून दिलेल्या कर्तव्यात कसूर करणे, इतिवृत्तात शेवटी सह्या न करणे अर्थसंकल्प तयार करताना सदस्याना विश्वासात न घेणे, स्वत च्या वार्डात कामे करणे, ग्रामपंचायतीचा जमाखर्च सदस्यांना न दाखवणे, ग्रामपंचायत विकास आराखडय़ात समावेश नसलेल्या कामावर खर्च करने, ग्रामपंचायत अभिलेख सत्यप्रति नागरिकांना न देणे, माणसे ओळखून काम करणे आणि सर्वात महत्वाचे व गंभीर म्हणजे लाॅकडाऊण काळात इतर सदस्यांना न विचारता किंवा विना संम्मती मास्क व सॅनिटायझर ची खरेदी करून शासकीय निधीचा अपहर केल्याचा ठपका ठेवून अविश्वास ठराव संमत करण्यात आला यावेळी मानिवली ग्रामपंचायतीच्या कार्यालयात हात उंचावून मतदान घेण्यात आले यावेळी अविश्वास ठरावाच्या बाजूनी 3 सदस्यांनी मतदान केले. त्यामुळे एक विरुध्द तीन असा अविश्वास ठराव मंजूर झाला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार दीपक आकडे हे उपस्थित होते.

No comments:
Post a Comment