"बापाचा दिवस ... फादर डे"!
आज फादर डे च्या निमित्त काही तरी माहिती आपल्या जाणकार लोकांना द्यावी म्हणून हा अट्टाहास. फादर्स डे हा पितृत्व आणि पितृबंधांचा सन्मान करण्याचा दिवस आहे, तसेच समाजात वडिलांचा प्रभाव आहे. युरोपच्या कॅथोलिक देशांमध्ये हा काळ मध्ययुगापासून 19 मार्चला सेंट जोसेफ डे म्हणून साजरा केला जातो. अमेरिकेत, फादर्स डेची स्थापना सोनोरा स्मार्ट डॉड यांनी केली होती, प्रथमच जूनच्या तिसर्या रविवारी साजरा केला गेला. जगातील बर्याच भागांमध्ये वेगवेगळ्या दिवशी हा दिवस साजरा केला जातो. वर्ष, सहसा मार्च, मे आणि जून महिन्यात येते.
हा दिवस आपल्या देशात क्वचित साजरा केला जातो. बापाचा दिवस बोलले तरी चालेल. आजकाल पितृ तूल्य मुले आणि मुली मानतात असे नाही. एक केक आणून तो कापून हॅपी फादर डे म्हणून तोंडात केक टाकला की झाला साजरा फादर डे.
ज्याच्या अंगावर व खांद्यावर खेळला, लहानचा मोठा केला. शिक्षण देऊन समाजात मानाचे स्थान मिळवून दिले. अशा या महान बापाला फ़क्त केक भरवून आनंद देता येत नाही. तर रोज या बापाची जाणीव मनाशी बाळगून अंतःकरनातून त्यांचे आभार मानावे हिच फादर डे ची शुभेच्छा .
अरुण ठोंबरे
9322107521

No comments:
Post a Comment