*जीवन आधार फौंडेशन रेस्क्यू फोर्सची जन सेवा हीच ईश्वर सेवा*
अरुण ठोंबरे : भारतात कोणतीही आपत्ती असो, वा निसर्ग संकट असो, विश्वासाला पात्र ठरलेली जीवन आधार फौंडेशन रेस्क्यू ही संस्था गेली 6 वर्ष अखंड काम करत आहे. प्रत्येक वर्षाचा एक एक टप्पा पार करत आज पूर्ण महाराष्ट्र भर नव्हे तर भारतात जीवन आधारने कामाच्या माध्यमातून ठसा उमटवला आहे. आणि या सामाजिक कार्याचा आढावा घेऊन संपूर्ण महाराष्ट्र व भारतभर संस्थेला 15 राज्यस्तरीय पुरस्कार आणि दोन नॅशनल अवॉर्डने गौरवण्यात आले आहे.
संस्थेच्या नावासोबतच रेस्क्यू जोडलेले आहे
रेस्क्यू म्हणजे आपत्कालीन परिस्थिती मधे पुरुष जवान आणि महिला जवान आपल्याला जीवाची बाजी लावून पुर आपत्तीमुळे, भुकंम्पामुळे, अपघातामुळे, जी काही मनुष्य हानी वित्त हानी आणि प्राण्यांना सौरक्षण करण्यासाठी आणि सामाजिक दृष्ट्या सर्व प्रकार टाळण्यासाठी आणि माळीण गाव वाहुन गेलं तिथे मदतीचा हात, उत्तराखंड येते प्रलय आला तेथे जे जवान कायम तत्पर असतात. रेस्क्यू फोर्स हा संस्थेचा गाभा आहे. जवळ जवळ पूर्ण कोल्हापूर मधे नंबर एकला जीवन आधार टीम आहे आणि त्यांची संख्या महिला पुरुष 650 एव्हढी आहे आणि महिला रेस्क्यू फोर्स टीम संपूर्ण भारतामधील 150 महिलांची पहिली रेस्क्यू टीम आहे.
जीवन आधार टीम मध्ये सर्प मित्र प्राणी मित्र, पक्षी मित्र, कित्येक प्रकारचे सर्प पकडून त्यांना जीवदानी दिले आहे, खोल प्रवाहातील मगरी पकडण्याचे कार्य हि टीम जीवाची परवा न बाळगता आणि कोणतेही शुल्क न घेता कार्य करते.
सामाजिक संस्था म्हणजे केवळ देखाव्या साठी काम न करता जीवन आधार या संस्थेशी जोडलेला प्रत्येक पदाधिकारी प्रत्येक सभासद तळागाळातील गरजू लोकांना मदतीचा हात देत असतो.मग ती परिस्थिती कोणती ही असो पूर असो की अन्य काही.
शासनाच्या आदेशाचे पालन करून आपत्कालीन आपत्ती व्यवस्थापन सहकार्याने सामाजिक बांधिलकी जपते आणि कायमस्वरूपी जपणार आहे.
पर्यावरणाचा विचार करता पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास लक्ष्यात घेत प्रत्येक जिल्हा पातळी वर 5000 झाडे आम्ही लावली हा विक्रमी उपक्रम जीवन आधारने राबवला. ह्याचे संगोपन संस्थे मार्फत केले जाते आणि प्रत्येक वर्षी एक झाड लावा आणि जगवा हा उपक्रम आयुष्य भर राहील.
*एक व्यक्त एक झाड* अशी संकल्पना मांडत जीवन आधारने जनतेला आवाहन केले आणि जनतेचा खुप प्रतिसाद मिळाला. आणि हा उपक्रम आता सुरूच आहे प्रत्येक व्यक्तीने झाड लावल्या नंतर त्याला संस्थे मार्फत पर्यावरण रक्षक म्हनून सन्मान पत्र देऊन कौतुक केले जाते.
प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याचा विचार करता जीवन आधारने महाराष्ट्र अंतर्गत आरोग्य, विषयक अनेक उपक्रम राबवले आहेत.
प्रत्येक शहर गाव परिसर शाळा कॉलेज ह्या ठीक ठिकाणी जाऊन व्यसन मुक्ती च्या कार्यशाळा घेतल्या त्या कार्य शाळांमधून जनजागृती केली आणि तंबाखू चे होणारे दुष्परिणाम आम्ही सर्वाना पटवून दिले आज महाराष्ट्र मधे जवळ जवळ 700 च्या वर तंबाखू मुक्ती गावे केली आहेत.
तसेच H.I.V.(एड्स) बाबतीत लोकांची असणारी मानसिकता एड्स बाधित व्यक्तीच्या बाबतीत होणारा छळ ही बाब लक्षात येताच प्रत्येक शाळा कॉलेज गाव परिसर ग्रामपंचायत अश्या ठिकाणी जाऊन त्या बाबत जनजागृती केली गेली. तसेच आरोग्य शिबिरांचे आयोजन करून डोळे तपासणी त्या नंतर मोफत चष्मे वाटप रक्तदान शिबीर.आरोग्य तपासणी यांसारखे उपक्रम संस्थेत राबवले जातात.
एक सामाजिक बांधिलकी जपत महाराष्ट्र मधे दुर्गम भाग जास्त आहे त्या मधे आदिवासी वस्त्या पाडे आदिवासी वस्ती यांचा समावेश आहे. अश्या आदिवासी पाड्यांवर जाऊन तेथील गावात कपडे खाऊ वह्या पुस्तके वाटप करते तेथील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी हातभार लावणे हे जीवन आधारने मुख्य काम सुरु आहे. त्या साठी भिंत जीवन आधारची हा विक्रमी उपक्रम ठाणे जिल्ह्यात राबवला त्या अंतर्गत अनेक गावे दत्तक घेण्यात आली आणि गरजू लोकांना मदतीचा हात देण्यात आला.
काही अंध शाळांमध्ये अनाथ आश्रम मधे जीवन आधार कडून मोफत शिक्षण दिले जाते साहित्य पुरवले जाते.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री शंकर पोवार यांनी आपले मनोगत मांडताना म्हणाले की, आपला महाराष्ट्र हा संतांची भूमी म्हनून ओळखला जातो आणि आपले भाग्य आपण शिवरायांच्या महाराष्ट्र मधे राहतो. हेच भान ठेवून आमच्या संस्थेकडून शिवकालीन गड किल्ले यांचे संवर्धन केले जातात. पुरातन वास्तू यांचे जतन केल्या जातात जिल्ह्यात असणाऱ्या गड किल्याना भेटी देऊन तेथील डागडुजी आमचे समाजसेवक निष्ठेने करत असतात. सध्या आपल्या भारतावर कोरोना सारख्या गंभीर आजाराने थैमान घातले आहे. तरी ही आमची संस्था मागे न राहतात आमचे रेस्क्यू फोर्स चे जवान तसेच सर्व पदाधिकारी यांनी शक्य तेवढी मदतीचा ओघ संपूर्ण महाराष्ट्र भर पोहचवला त्यात ( तांदूळ डाळ कांदे बटाटे भाजीपाला गरजूंसाठी साहित्य व सॅनिटायझर मास्क असे अन्य गीष्टींचे मोठ्या प्रमाणावर वाटप करण्यात आले. त्या बाबत ही संपूर्ण महाराष्ट्र भर आमचे कौतुक झाले. हे सर्व श्रेय माझ्या एकट्याचे नसून मझ्या संस्थेशी निगडित असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे आहे असे मी समजतो कारण मदतीचा एक हात हा नेहमीच अपुरा असतो पण त्या एक हाता सोबत मी आज महाराष्ट्र भर अनेक हात जोडून माझे विचार आणि माझ्या सोबत असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे विचार ह्या विचारावर विचार करून आम्ही प्रत्येक जण तळागाळातील व्यक्ती पर्यंत पोहचत असतो आणि त्यांना साहाय्य करत असतो.
आणि भाविषयामध्ये समाजसेवेचा हा वृक्ष नक्कीच वटवृक्ष मधे होईल अशी मी शास्वती देतो. आमच्या जीवन आधारचे उपाध्यक्ष सुनिल कांबळे,महीला अध्यक्षा सौ.शोभाताई शिंदे,सेक्रेटरी संभाजी पोवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.
🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪


No comments:
Post a Comment