Sunday, 21 June 2020

"पैशाच्या हव्यासापोटी भारतीय सैन्य दलाचा तोतया अधिकारी बनून युक्ती पत्रांची वाटली खैरात.."

"पैशाच्या हव्यासापोटी भारतीय सैन्य दलाचा तोतया अधिकारी बनून युक्ती पत्रांची वाटली खैरात.."


पुणे ग्रामीण - सैन्यदलाच्या शिपाई, क्लार्क, आणि तत्सम पदाच्या बोगस पदांची नियुक्ती पत्रे थेट नौदलाच्या अधिकाऱ्याच्या वेशात दिली असल्याची माहिती समोर येत आहे. या फसवणूक प्रकारामुळे सैन्यदलाची प्रतिमा मलीन झाल्याचे चित्र आहे.

बारामतीचा नितीन जाधव आणि फलटणचा आकाश डांगे आणि इतर काही साथीदार हे रॅकेट चालवत असल्याचे समोर येत आहे. बारामतीचा नितीन जाधव हा तर एका संस्थेच्या माध्यमातून गेली दहा वर्षांपासून नोकरीचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक करत आहे. मात्र त्याला आणि त्याच्या टोळीला इतक्या दिवस राजकीय वरदहस्त लाभला आहे. त्यामुळे ते अनेक तरुणाचे आर्थिक शोषण करण्यात यशस्वी झाले आहे.
 
मास्टर माईंड असलेल्या नितीन जाधव आणि आकाश डांगे हे या तरुणांना थेट लोणावळ्यातील  आय एन एस शिवाजी या प्रशिक्षण केंद्रापर्यंत घेऊन गेले होते. देशाचा अभिमान असलेल्या या प्रशिक्षण संस्थने ७५ वर्ष पूर्ण केले आहे. दोन लाखाहून अधिक अधिकारी कर्मचारी येथे प्रशिक्षित होऊन देशाची सेवा करत आहेत अशा संस्थेच्या फसवणुकीसाठी वापर करणाऱ्या या बांडगुळांना काही पोलीस आणि पत्रकारांचा ही वरदहस्त लाभल्याचे समोर येत आहे,कारण सातारा जिल्यात फलटण येथे या आगोदर अशा प्रकारे सैन्यभरती घोटाळा समोर आला होता.

"पुणे ग्रामीण पोलिसांनी वाचवले शेकडो संसार.."

पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी या प्रकरणाची व्याप्ती ओळ्खल्यानंतर तातडीने गुन्हा दाखल करून या आरोपींच्या मुसक्या आवळल्या नसत्या तर यांना सोडवण्यासाठी बगलबच्यांनी नेत्यापर्यंत फिल्डिंग लावली असती. 

मात्र पुणे ग्रामीण चे स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पद्माकर घनवट आणि एपीआय दत्तात्रय गुंड  यांनी उचललेल्या कडक पावलांमुळे यांच्या मुसक्या आवळल्या गेल्या आहेत. त्यामुळे अजून काही तरुणांचे संसार आणि शेती वाचली असे मत सर्वसामान्य लोकांमधून व्यक्त केले जात आहे...

No comments:

Post a Comment

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !!

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !! ** नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील वाह...