विविध मागण्यांसाठी प्रशासकिय अधिका-यावर आरोप करत नगरसेवकाने सुरु केलेले आमरण उपोषण अखेर पोलीसांच्या मध्यस्थिने.स्थगित !!
मुरबाड (मंगल डोंगरे) : मुरबाड नगरपंचायत मध्ये काँग्रेस पक्षातून एकमेव निवडुन आलेले प्रभाग क्रमांक 6 चे नगरसेवक रवींद्र देसले यांनी मुरबाड नगरपंचायत चे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या वर भ्रष्ट अधिकारी असल्याचा आरोप करत विविध मागण्यांसाठी पुकािरलेले 15 ऑगस्ट पासूनचे नगरपंचायत समोर आमरण उपोषणाचा इशारा दिला होता .मात्र मुरबाड पोलिसांनी मध्यस्थी चा मार्ग काढल्याने हे उपोषण स्थगित करण्यात आले आहे.
मुरबाड नगरपंचायत प्रभाग 6 चे प्रवेशद्वार डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर प्रवेशद्वार बांधणे याचा ठराव क्रमांक 25 हा सर्वसाधारण सभा दि 09जुलै 2018 रोजी मंजुर करण्यात आला होता .मात्र मुख्यधिकारी जातीयवादी असल्याचा आरोप करत त्यांनी या कामावर दुर्लक्ष केल्याने त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती कायद्याच्या नुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मुरबाड शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्याचा ठराव एकमताने मंजूर असताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी विरोध केला .तर पुतळ्यासाठी स्मारक समितीने दिलेले कागदपत्र गायब केल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला आहे.
मुख्यधिकारी यांच्या विरोधात दिलेल्या निवेदनात सि सर्व्हे न 136 /अ या गावठाण जागेवर ग्रामपंचायत ने बांधलेले शौचालय हटवून महसूल जागेवर शौचालय बांधल्याने जिल्हाधिकारी यांनी योग्य ती कारवाई करावी , रवींद्र देसले हे आरोग्य सभापती असताना स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पहिल्या वर्षी नगरपंचायत ला 1 कोटी व दुसऱ्या वर्षीही 1कोटी रुपये बक्षीस मिळाले परंतु हा बक्षीस रुपी मिळालेला निधी कुठे खर्च केला .याची चौकशी करून सर्व नगरसेवकांना लेखाजोखा दयावा , मुरबाड नगरपंचायत हद्दीतील 300 ते 400 अनधिकृत गाळे धारकांना तात्पुरती भाडे पावती देण्याची मागणी ही त्यांनी केली आहे . तर असे अनेक भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत मुरबाड नगरपंचायत हद्दीतील अनधिकृत गाळ्यात अँक्सिस बँकेचे एटीएम व मेडिकल स्टोअर ला लाखो रुपये घेऊन परवानगी दिल्याने याची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र यासह अनेक मागण्या असताना स्वातंत्र्य दिनी आमरण उपोषण नको यासाठी पोलीस प्रशासन व उपोषण कर्ते यांच्यात योग्य ती चर्चा झाल्याने आमरण उपोषण स्थगित जरी झाले असले, तरी योग्य कारवाई न झाल्यास पुन्हा उपोषण करणार असा इशारा नगरसेवक रविंद्र देसले यांनी दिला आहे .

No comments:
Post a Comment