सुभाषनगरात सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था महिला व ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय !!
उल्हासनगर, सिध्दांत गाडे - सुभाषनगर उल्हासनगर नं . ३. पॕलन .नं. ९. या परिसरात सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था झाल्याने तो धोकादायक शौचालय केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत असल्याने सुभाषनगर परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दुसरी आश्चर्याची गोष्ट म्हणजे या परिसरातील सार्वजनिक शौचालयाला दरवाजे नाहीत तसेच शौचालयाचे भांडे सुध्दा तुटलेलीच आहेत आणि पाण्याची सोय नाही. त्यामुळे महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांची मात्र मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. याकडे मात्र उल्हासनगर महापालिका प्रशासन आणि नगरसेवक, मुकादम सफाई कामगार, यांचे मात्र दुर्लक्ष होत असून या सुभाषनगरात मात्र नेहमी विविध मुलभूत सुविधांची बोंब होत आहे. पॕनल नं .८. व. ९. सुभाषनगर या परिसरात रस्त्यावर नेहमी पाणी गळतीने भर रस्त्यात तळे निर्माण झाले असून डबक्यातून नागरिकांसह वाहनांना सुध्दा जावे लागत आहे. शिरसाट गल्ली येथे रस्याचे काम त्वरित करण्याची मागणी करून सुध्दा विकास कामे होत नाही. उल्हासनगर महापालिका प्रशासन, स्थानिक नगरसेवक याकडे दुर्लक्ष करीत आहेत. असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. नागरिकांच्या विविध सुविधांची बोंब म्हणजे सुभाषनगरात नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन सुध्दा गटारातून गेल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
याबाबत येथील रहिवाशांनी स्थानिक लोक प्रतिनिधीला वारंवार तक्रारी अर्ज करुनही याकडे मात्र दुर्लक्ष केले जात असल्याने येथील रहिवासी यांनी मात्र तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.
सुभाषनगरात नागरिकांना आपला जीव मुठीत धरुन चालण्याची वेळ आलेली आहे तसेच मूलभूत सुविधांपासून सुभाषनगर वंचित आहे. नेहमी रहिवाशांचा आक्रोश असतो आणि स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा उडाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. सुभाषनगराच्या समस्येकडे लक्ष दिले नाही तर आंदोलनाचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment