Wednesday, 19 August 2020

गणेशोत्सव काळात चालणारा जुगार कोरोनाचा वाहक - चालक ठरणार का?

गणेशोत्सव काळात चालणारा जुगार कोरोनाचा वाहक - चालक ठरणार का?


कल्याण (संजय कांबळे) : काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवावर कोरोनाचे संकट घोंघावत असतानाच आता या उत्सवात चालणारा जुगार हा कोरोनाचा वाहक - चालक ठरणार का असा प्रश्न उपस्थित होत असून पोलिसांनी मात्र या विरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सुतोवाच दिले आहे.
कोकणात विशेषतः ठाणे जिल्ह्यात सार्वजनिक तसेच घरगुती गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या काळात सर्वत्र मंगलमय व आंनदी वातावरण असते. पण याच बरोबरच अनेक सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सवात जागरण करण्यासाठी किंवा गणपती जागविण्यासाठी पत्त्याचा डाव मांडला जातो. अनेक वेळा या विरोधात पोलीसांनकडून कारवाई देखील झाली आहे. पण काही लोकांना अद्यापही शहाणपण आलेले नाही. काही सार्वजनिक मंडळांनी हे बंद केले आहे परंतु अनेक घरगुती गणेशोत्सवात जुगार चालतोच हे कोणीही नाकारू शकत नाही. पण यावेळेस परिस्थिती वेगळी आहे. आपल्या देशावर राज्यावर कोरोना कोव्हीड १९ या वैश्विक महामारीचे संकट आले आहे. अद्याप यावर औषध नसल्याने काळजी घेणे हेच आपल्या हातात आहे.
सध्या केवळ कल्याण तालुक्याचा विचार केला तर तालुक्यातील ग्रामीण भागात १४४ अॅक्टिव पेंशंट आहेत, कंटेन्मेंट झोन ची संख्या २७५ इतकी आहे. ९०२ लोकांना होमकोरोंटाईंग केले आहे तर १७६८ संस्थात्मक कोरोनटांइग झाले आहेत. ५६० पाॅझिटिव रुण्ग आहेत. तर आतापर्यंत २३ नांगरिकानी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे काही ठिकाणी कोरोनोच्या संकटात थोडीशी कमी आली आहे असे वाटत असले तरी. आता गणेशोत्सवात गर्दी वाढणार त्यातच दोन्ही बाजूंनी दुकाने उघडण्याचा निर्णय घेण्यात आल्याने येथे सोशलडिस्टींगचे बारा वाजणार, सॅनिटायझर, मास्क चा वापर कमी झाल्याचे आज दिसून आले. त्यामुळे कोरोनोच्या फैलावाला आयती संधी मिळणार आहे. त्यातच गणपती बाप्पा समोर रात्रभर जुगार खेळताना ना सॅनिटायझर, ना मास्क, ना सोशलडिस्टींग चे काटेकोर पालन होणार नाही. एका जुगारात ७,८ते १०किंवा १५ लोक असतात त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे कोरोनोच्या वाढत्या संकटाचा विचार करून यावर्षी जुगार न खेळता विघ्नहत्याला निरोप द्यायला हवा. कारण आपल्या कोरोना योद्धा ठरलेले वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, पोलीस, अंगणवाडी सेविका व मदतनीस, आशा कार्यकर्ती, स्वयंसेवक, ग्रामसेवक, सरपंच, सदस्य, कर्मचारी यांनी आपला जीव धोक्यात घालून नियंत्रणात ठेवलेला कोरोना कोव्हीड १९ हा आपल्या लाडक्या विघ्नहत्याच्या काळात विघ्ने घेऊन यायला नको असे वाटत असेल तर गर्दी व जुगार टाळायलाच हवा अन्यथा पोलिसांनी अशांना अद्ल घडविण्यासाठी "फुल टू "तयारी केली आहे हे लक्षात ठेवा
याबाबत कल्याण, मुरबाड तालुक्याचे डि वाय एस पी बसवराज शिवपूजे यांना विचारले असता ते म्हणाले "सध्या सर्वत्र कोरोना चे संकट आहे, त्यामुळे नागरिकांना गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा, गर्दी टाळावी, मंडळानी सॅनिटायझर, हॅन्डवाॅश, मास्क, स्वच्छता याचा अधिक वापर करून जुगार खेळणाऱ्याची गय केली जाणार नाही. तश्या सूचना प्रत्येक पोलीस ठाण्यांना देण्यात आल्या आहेत. "
तर आमच्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत अद्याप पर्यंत एकही कोरोनाचा पाॅझिटिव रुण्ग आढळून आला नाही त्यामुळे गणेशोत्सवात तो होऊ नये म्हणून आम्ही फलक किंवा नोटीस काढणार आहे असे एका ग्रामसेवकांने सांगितले. 

No comments:

Post a Comment

मुंबई प्रभाग १४४ मध्ये राजकीय भूकंप; महिला शाखा संघटक ममता भंडारी यांचा शिवसेनेचा राजीनामा !!

मुंबई प्रभाग १४४ मध्ये राजकीय भूकंप; महिला शाखा संघटक ममता भंडारी यांचा शिवसेनेचा राजीनामा !! मुंबई (शांताराम गुडेकर) :         ...