Wednesday, 19 August 2020

कल्याण पश्चिम येथील आदर्श कुटुंब उतेकर परिवार यांच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर .‌‌...

कल्याण पश्चिम येथील आदर्श कुटुंब उतेकर परिवार यांच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर .‌‌...


कल्याण : मुळ कोकणातील उतेकर कुटुंब रोजगाराच्या निमित्ताने कल्याण पश्चिम येथील बिर्ला कॉलेज परिसरातील भवानीनगर येथे अनेक वर्षांपासून रहात आहेत. 
मुळचा समाजसेवेचा पिंड यांनी ‌इथे पण जोपासला बिर्ला कॉलेज परिसरातील वार्ड क्रं. १६, भवानीनगर येथे १९९० भवानीनगर विभाग स्थापनेपासून ते आजपर्यंत उतेकर कुटुंब सामाजिक क्षेत्रात अग्रेसर काम करत आहेत. कुटुंबातील एक सदस्य कैलास वासी विजय शंकर उतेकर जे ग्रेट मराठा कोकणचा राजा या नावाने फिरणाऱ्या रिक्षाचे मालक यांचे १० ऑगस्ट २०२० रोजी दुपारी साडेचार वाजता ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तसेच कै. विजय उतेकर यांचे सख्खे मेहुणे कैलास वासी प्रदीप मानाजी जाधव रा. खडकपाडा पण मिलिंद नगर सामाजिक क्षेत्रात काम करणारे मराठा समाजाचे खंदे समर्थक यांची गेले एक महिन्यापासून रुग्णालयातील मृत्युशी चालू असलेली झुंज अपयशी ‌ठरून १२ ऑगस्ट २०२० रोजी स्वर्गवासी झाले. कै.विजय उतेकर यांच्या मातोश्री ज्यांना ०३ ऑगस्ट २०२० पासून रुग्णालयात दाखल केले होते त्यांना भवानीनगर येथील नागेश्वर सोसायटीतील रहात्या घरी आल्यानंतर दोनच दिवसात मातोश्रींची ज्योत मावळली. परिसरात अनेक सामाजिक कार्यकर्ते घडविणारी तसेच आयुर्वेदाचे ज्ञान असणारी काविळीचे औषध शहरातील नागरिकांना देऊन बरे करणारी माऊली. 


कल्याण शहरातील एक मान्यवर उतेकर कुटुंबातील ‌तीन सदस्यांचे पंधरा दिवसात‌ मृत्यू झाले असल्याने सर्वत्र हळहळ व दुःख व्यक्त करण्यात येत आहे. सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर व्यक्तींनी उतेकर कुटुंबाची भेट घेऊन तसेच पुणे, नासिक, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील नातेवाईक व मित्रपरिवार यांनी फोन तसेच इतर मार्गाने सांत्वना ‌व्यक्त केली व करत आहेत.
आता या कुटुंबातील जबाबदार व्यक्ती सुनील उतेकर हे या सर्वांचे दुरध्वनी वरून किंवा प्रत्यक्ष भेटून आभार व्यक्त करत आहेत. सुनील उतेकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त करुन कै. विजय उतेकर व त्यांच्या मातोश्री यांचे दहाव्या व बाराव्याचे विधी २१ ऑगस्ट २०२० रोजी रहात्या घरी नागेश्वर सोसायटी, भवानीनगर येथे आयोजित केले आहेत असे सांगितले.

No comments:

Post a Comment

विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सकल लिंगायत समाज तर्फे वाशी येथे निषेध आंदोलन !!

विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सकल लिंगायत समाज तर्फे वाशी येथे निषेध आंदोलन !! उरण दि १८, (विठ्ठल ममताबादे) : महाराष्ट्र राज्या...