मुरबाड पोलीस स्टेशनने राबविला कोरोना योद्धा सन्मान कार्यक्रम !!
मुरबाड {मंगल डोंगरे} : मुरबाड पोलिस ठाणे व पोलिस बांधवांच्या वतिने कोरोना व लाॅकडाऊनच्या काळात पोलिसांना मदत म्हणून खारीचा वाटा समजून मदत कार्य करणा-या शिलेदारांचा व कोरोना योद्धा यांचा आज उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपुजे व पोलिस निरीक्षक दत्तात्रेय बोराटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रस्तावना मांडताना मेजर खेडकर यांनी कोरोना काळात कार्य करणा-यांची ओळख करून दिली .तसेच पोलिसांनी केलेली कामगिरी करताना या कोरोना योद्धांची झालेली मदतही कथन केली. यावेळी उपस्थिताना संबोधित करताना डॉक्टर शिवपूजे यांनी आपल्या मदतीने आम्हाला आमचे कार्य करताना अनेक अडचणींवर मात करण्यास मदत झाली तसेच समाजातील प्रत्येक व्यक्तीने असे कार्य करत राहावे जेणेकरून आलेल्या कोणत्याही संकटांवर आपण मात करू शकू.
यावेळी सत्कार मुर्ती व कोरोना योद्धा म्हणून म्हणून
श्री.खेतवानी, रामभाऊ दळवी, म्हसा येथील बाळु पष्टे, मुरबाड मनसे विद्यार्थीसेना अध्यक्ष देवेंद्र जाधव, हरेश पुरोहीत, संतोष चौधरी उर्फ माऊली, उमेश हुमणे,
नगरपंचायतीचे संदिप देसले, लतिफ शेख, 'श्री टिबे, संतोष पातकर' 'श्री. लोहकरे सर', नरेश शहा, तुळशीराम भोईर, मनोज वारघडे, काळू बाळू हॉटेलचे मालक जुगल म्हाडसे, आदींचा मुरबाड पोलीस स्टेशनने कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मान केला.


No comments:
Post a Comment