Tuesday, 6 October 2020

पुणे - बंगळुरू महामार्गावरील नवले ब्रिज जवळ भीषण अपघात !

पुणे - बंगळुरू महामार्गावरील नवले ब्रिज जवळ भीषण अपघात !


पुणे : - पुणे-बंगळुरू महामार्गावरील नवले ब्रिज जवळ पाच ते सहा गाड्या एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला आहे.

या अपघाताची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत, तसेच अपघातातील काही जखमी नागरिकांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.

पुण्यात कात्रज ते नवले पूल दरम्यान ऑर्किड स्कुल जवळ मालवाहतूक ट्रकचे नियंत्रण सुटल्यामुळे त्यापुढील वाहने एकमेकांना धडकली. यामध्ये वाहनांचे मोठे नुकसान झाले असून दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा समावेश आहे.


या अपघातामध्ये १ जण जागीच मृत्यू पावला असून ६ ते ६ जण गंभीर आहेत. त्यांच्या जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मालवाहतूक ट्रकची धडक इतकी जोरदार होती की, पीक अप टेम्पो बाजूच्या चाकीवर कोसळून पडला.

No comments:

Post a Comment

मुंबई प्रभाग १४४ मध्ये राजकीय भूकंप; महिला शाखा संघटक ममता भंडारी यांचा शिवसेनेचा राजीनामा !!

मुंबई प्रभाग १४४ मध्ये राजकीय भूकंप; महिला शाखा संघटक ममता भंडारी यांचा शिवसेनेचा राजीनामा !! मुंबई (शांताराम गुडेकर) :         ...