Thursday, 8 October 2020

बिहार विधानसभा निवडणूक; माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडेंविरोधात शिवसेना देणार उमेदवार !

बिहार विधानसभा निवडणूक; माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडेंविरोधात शिवसेना देणार उमेदवार !


मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही आठवडेच शिल्लक राहिले आहे. सगळ्या पक्षांमध्ये उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्याची लगबग असून, शिवसेनेनंही बिहारच्या निवडणुकीत उडी घेतली आहे. बिहार विधानसभेच्या ५० जागा शिवसेना लढवणार असून, अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारवर आरोप करणारे बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांच्याविरोधातही शिवसेना उमेदवार देणार आहे.बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना शिवसेनेचे खासदार अनिलजी देसाई यांनी ही माहिती दिली. "सुशांत सिंह राजपूत प्रकरणात विनाकारण महाराष्ट्र, मुंबई आणि शिवसेनेला बदनाम करण्यात आलं. लोकांना कळतंय यामध्ये कोणाचा काहीही संबंध नव्हता. तरीही सूडबुद्धीचं राजकारण केलं गेलं. आम्ही आता बिहार निवडणूक लढवून याची परतफेड करणार आहोत. बिहार निवडणुकीत आम्ही ५० जागा लढवत आहोत. २०१५ ला शिवसेना बिहारमध्ये निवडणूक लढली होती, ज्यामध्ये दोन लाखांपेक्षा जास्त मतं शिवसेनेनं घेतली होती," अशी माहिती अनिलजी देसाई यांनी दिली.

No comments:

Post a Comment

गेल ओम्वेट आणि भारत पाटणकर यांच्या जीवनप्रवासावर आधारित माहितीपट 14 डिसेंबरला कोल्हापूरमध्ये प्रदर्शित !!

गेल ओम्वेट आणि भारत पाटणकर यांच्या जीवनप्रवासावर आधारित माहितीपट 14 डिसेंबरला कोल्हापूरमध्ये प्रदर्शित !! ** Gail & Bharat (2025) दिग्दर...