Sunday, 4 October 2020

खा.कपिल पाटील, आ.किसन कथोरेंच्या उपस्थितीत भाजपाची कार्यकारीणी जाहीर !!

खा.कपिल पाटील, आ.किसन कथोरेंच्या उपस्थितीत भाजपाची कार्यकारीणी जाहीर !!   


मुरबाड (मंगल डोंगरे) : आज खा.कपिल पाटील, व आ.किसन कथोरे यांच्या उपस्थितीत मुरबाडच्या भाजप कार्यकारिणीची घोषणा करण्यासाठी भाजपाच्या मुरबाड तालुका व शहर कार्यकारिणी तर्फे मुरबाडमध्ये खासदार कपिल पाटील व आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत एम. आय. डी. सी. हॉल येथे बैठक आयोजित केली होती. यानंतर पत्रकार परिषदेला सुरुवात करण्यात आली. मात्र टेक्नो कंपनीच्या पाँवर प्लांट प्रश्नामुळे स्थगित ही करण्यात आली. 

  मुरबाडच्या भाजप कार्यकारिणी घोषणा बैठकी दरम्यान व्यासपीठावर बोलतांना खासदार कपिल पाटील यांनी विविध मुद्द्यांवर बोट ठेवले. मध्यंतरी मुरबाड मधील भाजपच्या एका बॅनरवर खासदार कपिल पाटील यांचा फोटो नसल्याचा मुद्दा छेडत खासदार पाटील यांनी कार्यकर्त्यांची सौम्य खरडपट्टी काढली. तसेच कोणताही प्रचार न करता खासदाकीच्या निवडणुकीत मनसेला एक लाख मतदान असतो, त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी गाफील न राहता अधिक जोमाने कामाला लागण्याच्या सूचना ही केल्या.

  यावेळी कृषी विषयक विधेयकाच्या अनुषंगाने कृषी व्यवसायावर अधिक चर्चा करतांना खासदार पाटील यांनी कांदा व्यावसायिकांची उदाहरणे देऊन नफ्याच्या दावा केला. तसेच या विधेयकानुसार शेत मालाचा साठा करण्याची मुभा असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले. तर राफेल, तीन तलाख कायदा, काश्मीर ३७० कलम रद्द, आयुष्यमान भारत योजना, जनधन या माध्यमातून पंतप्रधान मोदींनी देशाचा सन्मान वाढवला असल्याचे ते म्हंटले.

  तर यानंतर सुरू झालेल्या पत्रकार परिषदे दरम्यान हाथरसच्या अत्याचाराचा मुद्दा घेत राहूल गांधीं समवेत सुप्रिया सुळे यांच्यावर ही टीका केल्या. मात्र केंद्राच्या कामगार विधेयकामुळे मुरबाड मधील टेक्नो कंपनीने आपला पॉवर प्लांट बंद करण्याचा निर्णय घेतला असून परिणामी सुमारे ५६ कामगारांवर एकाचवेळी बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळल्याचा विषयाला पत्रकारांनी हात घालताच पत्रकार परिषदेची सांगता करण्यात आली. त्यामुळे अनेक मुद्द्यांचा खुलासा होऊ शकला नाही. तर ही पत्रकार परिषद नेमकी का आयोजित केली होती? याबाबत ही संभ्रम कायम राहिले.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...