आमदार कालिदास कोळंबकर यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी कार्यक्रमांनी संपन्न !
वडाळा, (नितीन कदम) ; भारतीय जनता पार्टी वडाळा विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार श्री.कालिदास कोळंबकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कोरोना योद्धयांस दीपावली निमित्त दिवे वाटप, आंतर बीडीडी क्रिकेटच्या सामन्यांचे आयोजन आधार कार्ड चे रूपांतर स्मार्ट कार्ड मोफत वाटप, नेत्रचिकित्सा व मोफत चष्मा वाटप, अनाथ मुलींच्या आश्रमाला महिन्याभराचे रेशनींग साहित्य वाटप, बौध्द धम्मगुरू भिक्षु यांना चिवरदान व स्नेंह भोजनदान करून साप्ताहिक कार्यक्रमाचा समारोप यानिमित्ताने करण्यात आला होता.सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे कार्यसम्राट आमदार श्री.कालिदास कोळंबकर, श्री.राजेश शिरवाडकर अध्यक्ष द.म.मुंबई भाजपा श्री.नीरज उभारे महामंत्री द.म.मुंबई भाजपा आदी मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन भाजपा द.म.मुंबई उपाध्यक्ष श्री. गजेंद्र भगवान धुमाळे यांनी केले होते. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नितीन कदम, हर्ष छेडा, योगेश कांबळे, अमोल गायकवाड, मयूर जाधव, चित्तरंजन हिरवे, सौरभ दळवी, अक्षय पवार, अंकुर गायकवाड, प्रथमेश होसमणी, संदीप संकपाळ, विजय चव्हाण, अरुण धुमाळ, सुनील गायकवाड, विक्रांत धिवर किरण प्रभाणे, राहुल मोटरे, चेतन सोलंकी, मनोज सोलंकी, शिवम राणावत, प्रणव सिंग, विक्की कांबळे यांनी अथक परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment