आमदार किसन कथोरे यांचे हस्ते मुरबाड न.प.हद्दीतील विकास कामांचे भुमिपुजन व लोकार्पण संपन्न !!
मुरबाड - {मंगल डोंगरे} :
मुरबाड विधानसभेचे आमदार मा. किसनजी कथोरे साहेब यांच्या शुभहस्ते आज मुरबाड शहरातील विविध प्रभागातील भुमीपूजन व लोकार्पण सोहळे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते पार पडले.. यात प्रामुख्याने आंबेडकर नगर येथिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशव्दाराचे उद्घाटन, संभाजी नगर येथिल समाजसेवक गोविंद हरी भोईर यांच्या नामफलकाचे उद्घाटन, माजी नगराध्यक्ष मोहन सासे यांनी प्रभाग क्र. १५ मधिल रस्ते काॕंक्रीटिकरण सह विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले. प्रभाग क्र. १७ मधिल रस्त्यांचे भुमीपुजन, स्व. मनुबाई महादु कार्ले यांनी मुरबाड नगरपंचायतसाठी दिलेल्या जागेचं दानपत्र फलकाचे उद्घाटन तसेच
बागेश्वरी तलावाचे सुशोभिकरणाचा भुमिपूजन सोहळा असे विविध कामांचे लोकार्पण व भुमीपुजन आज करण्यात आले.
या उद्घाटन प्रसंगी बोलताना आमदार कथोरे म्हणाले की मुरबाड नगरपंचायत भविष्यात महाराष्ट्रात एक रोल माॕडेल असेल राज्यात नंबर वन नगरपंचायत बनविण्याचा आपला मानस आहे.
आज संपूर्ण मुरबाड शहरात काॕंक्रीटिचे रस्ते, गटारे, पथ दिवे, हाय मास्ट, शौचालये, व महत्त्वाचे म्हणजे मुरबाडकरांना मुबलक स्वच्छ पाणी मिळत आहे. या पाच वर्षात मुरबाड शहराला एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. लवकरच घनकचरा सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्प तयार होणार आहे. बागेश्वरी तलाव येथे मुरबाडकरांना पर्यटनाचा आनंद मिळणार आहे. त्या ठिकाणी बोटींग व्यवस्था झाली आहे. भविष्यातिल मुरबाड हा खूप वेगळा असेल तेव्हा मुरबाड शहराच्या विकास कामांसाठी निधि कमी पडू देणार नसल्याचे आमदार महोदयांनी ग्वाही दिली.
या उद्घाटन प्रसंगी नगरपंचायतचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ, भाजपा पार्टीचे तालुका अध्यक्ष जयवंत सूर्यराव, नगराध्यक्षा छायाताई चौधरी ,उपनगराध्यक्षा अर्चना विशे, शहराध्यक्ष सुधिर तेलवणे, लियाकत शेख सर, सुरेश कार्ले, माजी नगराध्यक्ष मोहन सासे, नारायण गोंधळी, तालुका सरचिटणीस सुरेश बांगर, जयवंत कराळे, माजी, स्विक्रुत नगरसेवक सुरेश (नाना) साबळे, नगरसेवक रविंन्द्र देसले, संतोष कोळेकर, मुकेश विशे, अतुल देशमुख, अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा मुरबाड शहर नगरसेविका साक्षी चौधरी, स्नेहा चंबावणे, उर्मिला टोले- ठाकरे व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment