मनसेचे डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश, शिवसेनेचे पक्षप्रमुख व माननीय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बांधले शिवबंधन !
'डोंबिवलीत मनसेला मोठा हादरा'
डोंबिवली : मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा शहराध्यक्ष तसेच राज ठाकरे यांचे जवळीक असलेले खंदे समर्थक राजेश कदम यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधित त्यांचा पक्षात प्रवेश करुन घेतला. यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि नगरसेवक राजेश मोरे उपस्थित होते. राजेश कदम यांच्यासोबत डोंबिवली मनविसे शहराध्यक्ष सागर जेधे, दिपक भोसले, राहूल गणपुले, कौस्तुभ फडके, सचिन कस्तुर, स्वप्निल वाणी, राजेश मुणगेकर आणि काही कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यांच्यासोबतच मनसेचे कल्याण ग्रामीणचे कार्यकर्ते अर्जुन पाटील यांनीसुद्धा प्रवेश केला. तसेच अंबरनाथ मधील भाजप नगरसेवक सुनील सोनी, तुळशीराम चौधरी, भाजप जिल्हा सरचीटणीस सरीता चौधरी, बळीराम पालांडे यांनीही शिवसेनेत प्रवेश केल्याचे शिवसेनेच्यावतीने सांगण्यात आले.
प्रवेश झाल्यानंतर राजेश कदम यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी जो कामाचा धडाका लावलेला आहे, ते मेहनत घेत आहेत. ही जमेची बाजू वाटली, विरोधी पक्षात असताना त्यांचे काम पाहीले सुद्धा त्यामुळे शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की प्रवेश करणाऱ्यांचे आम्ही स्वागत करतो. कल्याण डोंबिवली आणि महाराष्ट्रात इतर ठिकाणी शिवसेना वाढत आहे. त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी वाव दिला जाईल. आता शिवसेना राजेश कदम यांना कोणती जिमेदारी देतात हे पाहावे लागेल.

No comments:
Post a Comment