Saturday 20 March 2021

कांबा गावाजवळील पावशेपाड्यात नऊ जंणाच्या हत्यारबंद चोराच्या टोळीचा धुडगूस, रायते पर्यंत मनसोक्तपणे लुटालूट मारहाण, पोलिस निष्क्रिय?

कांबा गावाजवळील पावशेपाड्यात नऊ जंणाच्या हत्यारबंद चोराच्या टोळीचा धुडगूस, रायते पर्यंत मनसोक्तपणे लुटालूट मारहाण, पोलिस निष्क्रिय? 


कल्याण, (संजय कांबळे) : कांबा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पावशेपाडा गावात रात्री दिड ते अडीच च्या सुमारास ९ जणांची हत्यारबंद टोळी अगदी बिनधास्त पणे संपूर्ण गावात फिरुन जो भेटेल त्याच्या मानेवर तलवार ठेवून चैन अंगठी, मोबाईल, महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, गाठी, कानातील नेतात, त्यांच्या रस्त्यात जो येईल त्याला जबरदस्त मारहाण करून लुटलं असे रायते गावापर्यंत सुरू राहुनही दोन्ही टोकाला दोन पोलीस चौक्या असूनही या चोरांची ही हिंमत होते याला पोलिसांची निष्क्रियता म्हणायची का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


कल्याण तालुक्यातील कांबा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पावशेपाडा हे गाव उल्हास नदीच्या काठावर वसले आहे. रात्री दिड ते अडीच वाजण्याच्या सुमारास कल्याण मुरबाड या मुख्य रस्त्यापासून गावात येणाऱ्या अतर्गत रस्त्याने सुमारे ९ जणांनी हत्यारा सह गावात प्रवेश केला. प्रथम गावाच्या बाहेर असलेल्या चंदकांत भगत यांच्या घराभोवतीच्या फिरले परंतु येथे काही सापडले नाही म्हणून गावात घुसले गावातील सुभाष भगत, प्रकाश भगत आणि हरिभाऊ भोईर यांच्या घरांना लक्ष केले. महेंद्र भगत यांच्या बेडरूमला बाहेरुन कडी लावून घरातील महिलांना शस्त्रांचा धाक दाखवून मंगळसूत्र, चैन, गाठी मोबाईल आदी वस्तू लांबल्या. असेच प्रकाश भगत व हरिभाऊ भोईर यांना देखील लुटले. यांनतर गावातील तरुणमंडळी जागी झाली असता हे नदीच्या काठावरुन पाचवामैल मंदिराकडे निघाले. असे भगत यांनी सांगितले. पुढे पाचवामैल येथील शिवसेनेचे दता भोईर यांचे आॅफिस फोडले. विशेष म्हणजे हे सगळे रस्त्याने पायी जात होते, पुढे पांजरपोळ येथे या चोरट्यांनी एका भैय्याला बेदम मारहाण केली. व त्याच्याकडील पैसे लुटले. येथून ही गॅग रायते येथे पोहचली. कल्याण मुरबाड रस्त्याच्या बाजूला असलेल्या कडबा कुट्टी येथे पशुखाद्य घेण्यासाठी आलेल्या वाहोली येथील एका शेतकऱ्याला यांनी बेदम मारहाण केली व त्याला ही लुटले. यावेळी पहाटेचे ४:३० ते ५ वाजले होते.
महत्त्वाचे म्हणजे या घटनेच्या एका बाजूला म्हारळ पोलीस चौकी तर दुसरीकडे गोवेली पोलीस चोकी असताना या दरम्यान पोलिसांची नाईट पेट्रोलींग झाली नाही. ती झाली असती तर कदाचित आज हे बिनधास्त फिरणारे चोर लाॅकआफ मध्ये दिसले असते.
त्यामुळे कल्याण तालुका पोलीस ठाण्या अंतर्गत वाढलेली गुन्हेगारी, बिनधास्त होणाऱ्या चो-या मा-या, हाणामारी, जिवघेण्या शस्त्रांचा धाक, पोलिसांचा न राहिलेला वचक यावरून पोलिसांची निष्क्रियता दिसून येते. एके काळी याच पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे, बालाजी पांढरे, आदींनी कर्तव्य बजावले होते तेव्हा अशा गुन्हेगारांची हिंमत होत नव्हती. परंतु सध्याच्या परिस्थिती पुर्ण पणे उलटी दिसू येते. यासंदर्भात ठाणे जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांना फोन केला असतो त्यांनी उचलला नाही. तर मुरबाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ शिवपूजे यांना विचारले असता ते म्हणाले मी स्वत याकडे लक्ष देतो, परिस्थिती सुधारेल.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...