Friday, 19 March 2021

समृद्धी महामार्ग मुरबाड - कर्जत - खोपोली मार्गाला जोडुन मुरबाडच्या विकासाला मिळणार चालना देणार - 'आमदार किसन कथोरे'

समृद्धी महामार्ग मुरबाड  - कर्जत - खोपोली मार्गाला जोडुन  मुरबाडच्या विकासाला मिळणार चालना देणार  - 'आमदार किसन कथोरे' 


मुरबाड, (मंगल डोंगरे)  कोणत्याही भागाचा विकास हा त्या विभागाला जोडणा-या रस्त्यांमुळे होत असतो. हिच संकल्पना डोक्यात ठेवून रेल्वे व रस्ते महामार्गामुळे झालेला विकास पाहून याच धर्तिवर मुरबाड सारख्या ग्रामिण भागात विकासाच्या व रोजगाराच्या संधी निर्माण करायच्या असतील तर, रस्त्यांचे जाळे महत्त्वाचे आहे. रहदारी वाढविणे महत्त्वाचे आहे. मुरबाड शहर केंद्र स्थानी असल्याने मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांनी विकासाची दुरदृष्टी ठेवून शहापुर शहरालगत जाणारा मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गाला कर्जत - शहापुर रस्ता जोडणार असल्याचे मुरबाड येथे पञकारांशी वार्तालाप करताना सांगितले. नुकतीच त्यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकार्यां सोबत बैठक घेऊन चर्चा केली असून लवकरच या कामाला गती मिळणार आहे. त्याचसोबत सरळगाव येथे नविन कृषी विज्ञानकेंद्र, माळशेज घाटात भारतातील पहिला काचेचा तरंगता पुल, पाठगाव येथिल प्रस्तावित एम. आय. डी. सी यामुळे भविष्यात मुरबाड मध्ये रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. उरण येथिल जे. एन. पी. टी. बंदरात उतरलेल्या मालाची वाहतुक या मार्गाने होणार असल्याने भिवंडी, पडघा, पूर्णा याठिकाणी ज्या स्वरुपात गोडावून उभे राहिले आहेत व त्या भागातील शेतकऱ्यांना आज त्याचा फायदा मिळत आहे. त्याच पद्धतीने मुरबाड मधिल शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. तसेच तिर्थक्षेञ शिर्डीचे अंतर कमी होऊन मुरबाडची व्यक्ती दोन तासात शिर्डीला पोहचणार असल्याचे कथोरे यांनी सांगितले. मुरबाड शहर व तालुका अनेक महामार्गाने जोडला जाणार असल्याने भविष्यात रोजगाराच्या अनेक संधी मुरबाड तालुक्यात निर्माण होणार होतील असा आशावाद ही यावेळी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

पर्यटकांनी 'छत्रपती शिवाजी महाराज सर्किट' द्वारे ऐतिहासिक पर्यटनाचा लाभ घ्यावा - विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

पर्यटकांनी 'छत्रपती शिवाजी महाराज सर्किट' द्वारे ऐतिहासिक पर्यटनाचा लाभ घ्यावा - विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार ...