मुरबाड तालुक्यात अत्यावश्यक सेवेला प्राधान्य !
'कोव्हॅक्सिन ११३३ जणांना लसीकरण'
कल्याण (संजय कांबळे) : कोविड लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात मुरबाड तालुक्यात अत्यावश्यक सेवा बजावणा-या एक हजार एकशे तेतीस कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात आले आहे.त्यांच्या लसीकरणाचा आहे. दुसऱ्या टप्प्यात पत्रकार, खाजगी डॉक्टर्स, 50 पेक्षा जास्त वयाचे नागरिक, यांचा समावेश असणार आहे.
कोविड लसीकरणाच्या पहिल्या टप्पा मुरबाड तालुक्यात पार पडला आहे. आतापर्यंत लस घेतलेल्यापैकी कोणालाही साईडईफेक्ट (शारिरीक दुष्परिणाम) दिसुन आले नाहीत. यातील काहीना साधारण ताप सर्दी् सारखी लक्षण जाणवली आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी श्रीधर बनसोडे यानी दिली.
तालुक्यात २५ जानेवारी पासुन कोविड लसीकरण सुरू करण्यात आले आहे. यात प्रथम प्राधान्य आरोग्यविभाग, अंगणवाडी कर्मचारी आशा वर्कर्स, महसुल विभाग पोलिस, पंचायत समिती सदस्य, ग्रामसेवक, सरपंच अशा यांना प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे. यात अकराशे तेहतीस जणांना लसीकरण डोस देण्यात आला.
सोमवारपासून लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. या टप्प्यात पत्रकार, खाजगी डाॅक्टर, यात ५० वषॆ वयाचे वरिष्ठ नागरिक, व ज्यांना दुर्धर आजार आहेत त्या शुगर, ब्लडप्रेशर, अशा व्याधी असलेल्याना नविन aapचा डोस असुन, तो देण्या अगोदर वैद्यकिय अधिकारी संबधीत व्याक्तीची आरोग्य तपासणी करूनच डोस दिला जाईल. या नविन अॅपवर व्याक्तीश कोणीही नांवनोंदणी करु शकतो, मात्र डोस देताना त्या व्याक्तीची आरोग्य तपासणी केल्याशिवाय डोस दिला जाणार नाही, अशी माहिती आरोग्य विभागाकडून दिली गेली आहे.
लसीकरण केलेल्यांवर प्रशिक्षितीत पाच आरोग्य कर्मचारी व एक आरोग्य अधिकारी यांच लक्ष ठेवुन असुन, लसिकरण हे मुरबाड ग्रामिण रुग्णालयात सकाळी ९-३० ते सांय ७ ०० वा पर्यंत चालु असेल त्यामुळे स्वतःहून दुसऱ्या टप्प्यात पात्र नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन आरोग्य अधिकारी बनसोडे यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment