Thursday 1 April 2021

जिल्हा परिषद रत्नागिरी शिक्षण विभागाच्या वतीने पूर्ण प्रार्थमीक शाळा नाखरे नं १ ने पटकावला आदर्श शाळा पुरस्कार !!

जिल्हा परिषद रत्नागिरी शिक्षण विभागाच्या वतीने पूर्ण प्रार्थमीक शाळा नाखरे नं १ ने पटकावला आदर्श शाळा पुरस्कार  !!


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर/दिपक मांडवकर) :

      जिल्हा परिषद रत्नागिरी शिक्षण विभाग यांचेमार्फत दिला जाणारा आदर्श शाळा पुरस्कार प्रदान समारंभ कोरोना परिस्थितीमुळे मोजक्या उपस्थितीत शामराव पेजे सभागृहात नुकताच संपन्न झाला. पंचायत समिती रत्नागिरीच्या वतीने आयोजित केलेल्या सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सभापती संजना माने यांनी भूषवले. याप्रसंगी व्यासपीठावर गटविकास अधिकारी तुकाराम जाधव,  गटशिक्षणाधिकारी सशाली मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते. रत्नागिरी तालुक्यामध्ये सन २०१९-२० व २०२०-२१ मध्ये आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या शाळांचा यावेळी सन्मान करण्यात आला. सन २०१९-२० मध्ये वरिष्ठ गटातून रत्नागिरी तालुक्यातून आदर्श शाळा पुरस्कार पटकावणाऱ्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नाखरे  नं. १ ला ज्येष्ठ पंचायत समिती सदस्य सुनील नावले यांचे हस्ते प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
          शाळा मानकांची पूर्तता, भरघोस शैक्षणिक उठाव, भव्य दिव्य दिशादर्शक शिक्षण परिषद, शिष्यवृत्ती नवोदय परीक्षा यश, जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धा सहभाग, नाविन्यपूर्ण उपक्रम, पालक- ग्रामस्थ -समाज उत्कृष्ट सहभाग, स्वच्छ सुंदर गावासाठी  योगदान तसेच राष्ट्रीय कार्यातील सहभागाचा विचार करून शाळा नाखरे नं. १ ची आदर्श शाळा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. यामध्ये आजी-माजी शिक्षकवृंद, केंद्रप्रमुख महंमद  सय्यद,  तत्कालीन सरपंच विजय चव्हाण, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मोहन जाधव, शशिकांत जाधव त्याचबरोबर आदर्श शिक्षक सुहास वाडेकर, सहशिक्षक शशिकांत घाणेकर, अमोल साळुंखे, अंगणवाडीताई मंगला चव्हाण, पूजा धुळप यांचा मोलाचा वाटा असल्याची प्रतिक्रिया मुख्याध्यापक गोपाळ रोकडे यांनी दिली.
         दरम्यान प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई यांचेमार्फत आयोजित कोरोना काळातील  शिक्षणाची यशोगाथा वेबिनार मध्ये देखील आदर्श शाळा नाखरे नं१ ने  जिल्ह्याचे नेतृत्व करीत रत्नागिरी जिल्ह्याचा राज्यात  ठसा उमटविला आहे.
           विविध उपक्रमांचे आयोजनाने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणाऱ्या या शाळेला आदर्श शाळा पुरस्कार मिळाल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. शाळेच्या यशाप्रित्यर्थ खासदार विनायक राऊत, नामदार उदय सामंत, जि. प. अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी विशेष अभिनंदन केले असून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, डायट प्राचार्य डॉ. गजानन पाटील, शिक्षणाधिकारी निशादेवी बंडगर, उपशिक्षणाधिकारी सुधाकर मुरकुटे, संदेश कडव, विस्तारअधिकारी उत्तम भोसले, सरोज आखाडे यांनीही नाखरे परिवाराचे कौतुक केले आहे. कोरोना परिस्थितीत सोहळा आयोजित करून शाळेला पुरस्कार प्रदान केल्याबद्दल नाखरे सरपंच शुभदा नार्वेकर यांनी विशेष ऋण व्यक्त केले. शाळेच्या यशस्वी घौडदौडीत योगदान देणारे नाखरेवासीय, हितचिंतक यांनाही त्यांनी धन्यवाद दिले.

No comments:

Post a Comment

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !!

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !! चोपडा, प्रतिनिधी.. महाराष्ट्रात लोकसभेच्या नि...