Friday 16 April 2021

मोकाट फिरणारे, बिनकामान्यांना कोणीतरी आवरा, नागरीकांची आर्त हाक !!

मोकाट फिरणारे, बिनकामान्यांना कोणीतरी आवरा, नागरीकांची आर्त हाक !!


कल्याण, (संजय कांबळे) : संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाने हाहाकार उडवला असताना, व्हॅन्टीलेटर, आॅक्शिजन इतकेच नव्हे तर साधे बेड देखिल कोरोना पाॅझिटिव्ह पेशंट ला मिळत नसल्याने अशा रुग्णांना जमिनीवर, खुर्चीत, रिक्षात बसवून उपचार सुरू असल्याची विदारक चित्र सर्व राज्यांत असताना काही बिनकामे, उड्डाणटफू संचारबंदी देखील बिनधास्त, मोकाट फिरत असल्याची पाहून यांना कोणीतरी आवरा अशी आर्त हाक नागरिकांची आहे. त्यामुळे आता पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.


संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाची विदारक परिस्थिती आहे. कुठेही खाजगी किंवा सरकारी दवाखान्यात बेड शिल्लक नाही, रेमडिसिवीर औषध मिळेना झाले आहे. अशातच आता आॅक्शिजन चा तूडवडा जाणवू लागला आहे. अनेकांचा आॅक्शिजन अभावी जीव गेला आहे. कल्याण डोंबिवली चा विचार केला तर येथे उपचार करायला जागा नाही. मुंबई वरळीत तर खाजगी कंपनीकडून आॅक्शिजन सिंलेडर घरी नेले जात आहे. रोज हजारो कोविड टेस्ट केल्या जात आहेत. यातून दररोज शेकडो पाॅझिटिव्ह सापडत आहेत. शहरातील कोरोना आता गावा गावात पोहचला आहे
कल्याण तालुक्यातील कांबा वरप म्हारळ, गोवेली, म्हसकळ, निंबवली खडवली, घोटसई, आपटी, उतणे चिंचवली, बापसई, राया ओझल्री नडगाव, दाणबाव, खोणी वडवली रायते, मानवली अशा सर्वच गावात पेंशट आहेत. अनेकांचा मृत्यू झाला आहे. होत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र दहागाव, खडवली, निळजे तसेच ग्रामीण रुग्णालय गोवेली मधील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, सिस्टर हे देखील कोरोनाचे शिकार होत आहेत. वरप येथील कोरोना कोविड सेंटर मध्ये कोविड तपासणी केली असता यातील ९ रुग्ण पाॅझिटिव्ह आले आहेत. स्मशानात नंबर लागले आहे. या सर्व बाबींचा विचार करून शासनाने १४ एप्रिल पासून राज्यात संचारबंदी लागू केली. मात्र याचे कुठे ही पालन होताना दिसत नाही. कल्याण मुरबाड महामार्गावर बिनधास्त बिनकामे फिरताना दिसतात, म्हारळ, वरप, कांबा, पाचवामैल, रायते, उल्हास नदीवर, तसेच म्हारळ गावात यांची मोठी गर्दी दिसून येत आहे. विशेष म्हणजे यातील बहुतेकांनी मास्क घातले नव्हते. ग्रामपंचायत दंडात्मक कारवाई करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु तेथे दादागिरी, वादावादी, होते. त्यामुळे तेही दुर्लक्ष करित आहेत. या परिसरात लाॅकडाऊण आहे का या बद्दल शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे आता पोलिसांनीच याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
 
प्रतिक्रिया - आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीने आम्ही पुरेपूर अंमलबजावणी करतो आहे, दडांत्मक कारवाई देखील केली आहे. पण काही बिनकामे ऐकत नाहीत, येथे पोलिसांनी लक्ष द्यावे '-श्रीमती अश्विनी निलेश देशमुख, उपसरपंच, म्हारळ ग्रामपंचायत ता कल्याण.

No comments:

Post a Comment

भिवंडी लोकसभा मतदारसंघात माझा विजय निश्चित - भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) काल महाविकास आघाडीच्या मतदारसंघा...