Monday, 12 April 2021

राज्यातील दहावी व बारावीच्या परीक्षा लांबणीवर!!

राज्यातील दहावी व बारावीच्या परीक्षा लांबणीवर!!


मुंबई : राज्यभरातील दहावी - बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दहावीची परीक्षा जूनमध्ये होईल तर बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस घेण्यात येईल, असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलं आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, दहावी-बारावी परीक्षांचं काय होणार? अशी टांगती तलवार विद्यार्थी आणि पालकांच्या डोक्यावर होती. मात्र विद्यार्थ्यांचं आरोग्य हे सर्वोच्च प्राधान्य आहे, त्यामुळे परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचं शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं.

पण, सरकारनं बोर्डाची परीक्षा पुढे ढकलली असली, तरी शिक्षण विभागासमोरील आव्हान अद्यापही कायम आहे. एक म्हणजे मे अखेर आणि जूनपर्यंत परीक्षा पुढे ढकलली असली तरी तोपर्यंत कोरोनाचे संकट पूर्ण जाईल याची शाश्वती नाही. त्यामुळे 32 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा सुरक्षितपणे घेण्याचं आव्हान सरकारसमोर असणार आहे.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...