Friday, 21 May 2021

ठाण्याच्या पोलीस आयुक्त पदी ATS प्रमुख जयजित सिंग यांची नियुक्ती.!

ठाण्याच्या पोलीस आयुक्त पदी ATS प्रमुख जयजित सिंग यांची नियुक्ती.!


अरुण पाटील, भिवंडी :
 .        दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख जयजीत सिंग यांची ठाणे पोलीस आयुक्तपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र पोलीस दलात अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरू आहेत. आता ठाणे पोलीस आयुक्त पदावर राज्याचे एटीएस प्रमुख जयजीत सिंग  यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईत आढळलेल्या स्फोटक प्रकरणाचा तपास करत असताना एटीएसच्याच पथकाने सचिन वाझेच्या साथीदारांना जयजीत सिंग यांच्या नेत्रृत्वात अटक केली होती.
             आता त्याच जयजीत सिंग यांची बदली करण्यात आली आहे.इतकेच नाही तर सचिन वाझे याला गुजरातमधून सिमकार्ड देणाऱ्या व्यक्तीला सुद्धा एटीएसच्याच पथकाने अटक केली होती. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि त्याच दरम्यान जयजित सिंग यांची बदली ठाणेपोलीस आयुक्तपदावर करण्यात आली आहे.तर विनित अग्रवाल यांची एटीएस प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
            ठाणे पोलीस आयुक्तपदी असलेले विवेक फणसाळकर यांची काही दिवसांपूर्वी बदली करण्यात आली. विवेक फणसाळकर यांची व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित, मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. विवेक फणसाळकर यांच्या बदलीनंतर ठाणे पोलीस आयुक्तपदावर कुणाची वर्णी लागणार याची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा रंगली होती आणि त्यात जयजीत सिंग यांच्या नावाचाही समावेश होता. अखेर हे वृत्त खरे ठरलं असून जयजीत सिंग यांची ठाणे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...