Saturday, 15 May 2021

कल्याण मधून प्रहार पक्षाची उद्धव ठाकरेंना कळकळीची विनंती !

कल्याण मधून  प्रहार पक्षाची  उद्धव ठाकरेंना कळकळीची विनंती !


ठाणे : कोरोनाची साखळी (corona chain) तोडण्यासाठी लॅाकडाऊन १ जून पर्यंत वाढवण्यात आला आहे. राज्यात १४ मे पर्यंत लागू असलेले कठोर निर्बंध हे आणखी १५ दिवस कायम असणार आहेत. त्यामुळे नाका कामगार  इतर कामगार वर्गामध्ये नाराजीची भावना आहे. "लॉकडाउनच्या पुढच्या टप्प्यात कामगारांच्या निभाव लागणं कठीण आहे. ठाणे जिल्ह्यात कामगार  व्यापाऱ्यांचा लॉकडाउनला विरोध आहे" असे प्रहार जनशक्ती पक्षाचे कल्याण तालुका संघटक डॉ आदर्श भालेराव  यांनी सांगितले.

१ ते १५ तारीखपर्यंत आम्ही साथ दिली. मध्यम वर्गीय , कामगार समाज तुमच्यासोबत आहे. ठाणे  आमची कर्मभूमी आहे. आम्ही इथले स्थानिक आहोत. गेल्या 16 महिन्या पासून आर्थिक चळवळ बंद आहे. जवळ असलेला पैसा अनेक परिवाराचा उपचार दरम्यान खर्च झाला उरलेला पैसा अतिरिक्त वाढीव बिल मुळे आर्थिक कर्ज झाले. त्यामुळे घरात बसून निवारा कसा चालणार केंद्र व राज्य कोणतेही आर्थिक मदत करत नाही. किंवा आपती व्यवस्थापन निधी मदत केली जात नाही  विचार करा" असे भालेराव यांनी म्हटले आहे. "आम्ही दोन प्रस्ताव दिले आहेत. मार्गदर्शकतत्त्व घालून देऊन सकाळी ९ ते ४ किंवा एकदिवसाआड दुकाने उघडण्याची परवानगी 
द्या

कामगारांना सवलत द्या किंवा आर्थिक मदत करा 

, या परिस्थितीत कामगार वर्ग व व्यापारी वर्ग  तगून राहणे कठीण आहे" असे भालेराव  म्हणाले.
कामगार वर्ग याच्यावर भुकमारी वेळ निर्माण होत आहे. बाहेर माहामारी उपचार साठी खिश्यात पैसे नाही महागडी उपचार व टेस्ट  मुळे नागरिकांची पिळवणूक होत आहे. आणि सरकार तर्फे कोणतेही योग्य मदत सामान्य नागरिकांना पाहिजे तशी केली जात नाही.
आज 16 महिने झाले व्यवसाय ठप्प आहे. व्यापाऱ्यांचा किंवा कामगार वर्ग मध्यम वर्गीय कुटुंब याचा निभाव लागणे कठीण आहे. मासिक हप्ता, वेतन आणि दुकानांची भाडी वीज बिल  द्यायची आहेत. आमच्या मागण्यांचा पूनर्विचार करुन, लवकरात लवकर सकारात्मक प्रतिसाद द्या" अशी  प्रहार जनशक्ती पक्षाचे कल्याण तालुका संघटक डॉ आदर्श भालेराव यांनी राज्याचे मुख्यमंत्री याच्या कडे  मागणी  केली.

No comments:

Post a Comment

स्फूर्ती फाउंडेशन माध्यमातून आधारकार्ड नोंदणी शिबीर संपन्न !

स्फूर्ती फाउंडेशन माध्यमातून आधारकार्ड नोंदणी शिबीर संपन्न ! **शिबिरात आधारकार्ड नोंदणी व अद्यायावत करण्यासाठी नागरीकांची गर्दी **तसेच ब प्र...