Friday, 25 June 2021

चिंताजनक ! राज्यात नवीन कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा सलग तिसऱ्या दिवशी दहा हजाराच्या घरात !

चिंताजनक ! राज्यात नवीन कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा सलग तिसऱ्या दिवशी दहा हजाराच्या घरात !



मुंबई : राज्यात आज 9,677 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 10,138 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे बरे होणाऱ्यांची संख्या आता 57,72,799 इतकी झाली आहे. आज 156 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.94 टक्के एवढे झाले असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,05,96,965 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 60,17,035 (14.82 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6,33,748 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,248 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या 1,20,715 अॅक्टिव्ह केसेस आहेत.

1 comment:

  1. आता सांगतात 50 लाख लोकाना तिसर्या लाटेचे बळी ठरणार याना काय कोरोना स्वप्नात येऊन सांगतो का यांचे हेच ठरवतात केव्हा कोरोना जाणार केह्वा येणार ते हे असेच राहिले ना तर आपला देशात किती बिकट अवस्था येईल हे माहित नाही याना

    ReplyDelete

खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात आधार कार्ड शिबिरांचे आयोजन !!

खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात आधार कार्ड शिबिरांचे आयोजन !! कल्याण लोकसभा मतदारसंघात हजारो नागरिकांना आधार कार्डा ...