Wednesday 27 October 2021

संघर्ष समितीचा एल्गार .. "२७ गावातील अवाजवी मालमत्ता कराच्या बिलाची निषेधार्थ पालिका प्रवेशद्वारावर बिलाची होळी करण्याचा निर्धार" ....

संघर्ष समितीचा एल्गार .. "२७ गावातील अवाजवी मालमत्ता कराच्या बिलाची निषेधार्थ पालिका प्रवेशद्वारावर बिलाची होळी करण्याचा निर्धार" .... 


कल्याण, ऋषिकेश चौधरी : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत समाविष्ठ केलेल्या २७ गावाच्या मालमत्ता करात दहा पटीने वाढ केली असून अन्यायी मालमत्ता करातील वाढ कमी करण्यासाठी पालिका प्रशासनाने अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही पालिका प्रशासन दंडेलशाही सुलतानी झिझिया कर लादून करीत असलेल्या लुटमारीच्या निषेधार्थ सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने दंड थोपटले आहे. संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्तांची भेट घेत पालीका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारा वरच मालमत्ता कराच्या बिलाची होळी करण्याच्या परवानगीसाठी ना पत्र देत प्रशासनाला कात्रीत पकडले  आहे .


या भागातील नागरिकांना उध्वस्त करण्याचा डाव पालिका प्रशासनाने रचला असल्याचा आरोप सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने  केला आहे. पालिका प्रशासनाच्या दंडेल शाहीच्या विरोधातील निषेध नोंदविण्यासाठी संघर्ष समितीने पालीका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारा वरच मालमत्ता कराच्या बिलाची होळी करण्याच्या परवानगीसाठी  पालिका आयुक्तांना पत्र देत प्रशासनाला कात्रीत पकडले असल्याने २७ गावातील मालमता कराचा प्रश्न अधिकच चिघळत चालला असल्याचे दिसून येत आहे.


कल्याण डोंबिवली महापालिकेत समाविष्ट होण्यास २७ गावातील जनतेचा प्रखर विरोध असतानाही सदरची गावे जबरदस्तीने महापालिकेत समाविष्ट करण्यात आली
असून या गावातील मालमत्ता करात पालिका प्रशासनाने दहा पटी पेक्षा वाढ करण्याचा अन्यायी निर्णय लागू केल्याने अवाजवी व सुलतानी झिझिया कर कमी करून पूर्ववत ग्रामपंचायत दरानुसारच आकारण्यात
यावा यासाठी ह्या अगोदर आम्ही अनेक अर्ज विनंत्या महापालिका प्रशासन आणि शासन दरबारी सादर केलेल्या आहेत. दंड जनतेला मान्य नसल्यामुळे ह्या करिता सनदशीर मार्गाने येथील जनतेचे आंदोलन सुरू आहे.परंतु आजपर्यंत महापालिकेने त्याची दखल घेतलेली नसल्याने २७ गावे महापालिकेतून वगळण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे .
सर्व हक्क संरक्षण पक्षीय अध्यक्ष गंगाराम शेलार, उपाध्यक्ष गुलाब वझे ,सरचिटणीस चंद्रकांत पाटील, दत्ता वझे, गजानन मांगरूळकर, अर्जुन चौधरी, रंगनाथ ठाकूर आदी प्रमुख पदाधिकाऱयांनी पालिका आयुक्त डॉ. विजयकुमार सूर्यवंशी यांनी भेट घेतली.

मालमता कर कमी करण्याबाबत आयुक्तांकडे गाऱ्हाणे मांडले. व अन्यायी करामुळे २७ गावातील जनता अत्यंत प्रक्षुब्ध झालेली असून पालीका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारा वरच मालमत्ता कराच्या बिलाची होळी करण्याच्या निर्णय जनतेने घेतला असून सनदशीर मार्गाने ९ नोव्हेंबरला आंदोलन केले जाणार असून या आंदोलनासाठी  परवानगी द्यावी असे ना पत्र शिष्ठमंडळाने पालिका आयुक्तांना देत प्रशासनाला कात्रीत पकडले.

No comments:

Post a Comment

भिवंडी लोकसभा मतदारसंघात माझा विजय निश्चित - भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) काल महाविकास आघाडीच्या मतदारसंघा...