Monday, 1 November 2021

ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याकडून चिपळूण व खेडमधील पूरग्रस्त शाळांना व विद्यार्थ्यांना आर्थिक व शैक्षणिक मदत !!

ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याकडून चिपळूण व खेडमधील पूरग्रस्त शाळांना व विद्यार्थ्यांना आर्थिक व शैक्षणिक मदत !!

संदीप शेंडगे / बातमीदार,
ठाणे : २२ जुलै २०२१ रोजी कोकणात मुसळधार पाऊस पडल्याने चिपळूण, खेड, कराड या भागात महापूर आलेला होता. त्याचबरोबर काही भागात भूस्खलन झालं होतं. अनेक शाळांमध्ये व विद्यार्थ्यांच्या घरामध्ये पुराचे पाणी शिरले होते, त्यामुळे वह्य़ा दप्तर पुस्तक, शाळेतील भौतिक सुविधांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या शाळांना "महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष तथा कोकण विभाग शिक्षक सेनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रेसर" यांच्यावतीने  महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या माध्यमातून आर्थिक मदत व शैक्षणिक साहित्य वाटप केले.
        चिपळूण आणि खेड व कराड मधील सदर पूरग्रस्त शाळांना व विद्यार्थ्यांना वह्या व दप्तर तसेच ६ शाळांना प्रत्येकी ५००० रु. आर्थिक मदत देण्यात आली. तसेच साखरे गावात भूस्खलनात जीव गमावलेल्या  सतरा लोकांना श्रद्धांजली वाहिली व कुटुंबातील सर्व व्यक्ती गमावलेल्या कुमारी. राणी वसंत मोहिते या विद्यार्थिनीला ५ हजारांची आर्थिक मदत दिली.
       "ज्ञानविकास संस्थेचे अध्यक्ष श्री सुरेश संकपाळ"  यांच्यावतीने दप्तर ,वह्या विद्यार्थ्यांना पुरविण्यात आल्या. शाळांना आर्थिक मदत व शैक्षणिक साहित्य वाटप करताना रत्नागिरी जिल्हा मुख्याध्यापक संघाची अध्यक्ष विजय पाटील, रत्नागिरी जिल्हा शिक्षक सेनेचे अध्यक्ष संदीप कांबळे, प्राध्यापक सेनेचे जिल्हाध्यक्ष सम्राट मानेसर, खेड तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष खेडेकर, खेड तालुका शिक्षक सेनेचे अध्यक्ष शिरसाठ, ज्ञानविकास शिक्षण संस्थेचे सचिव नांदूरकडे, संचालक यादवसर, ठाणे जिल्हा शिक्षक सेनेचे उपाध्यक्ष विलास आंग्रे, रत्नागिरी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे कोषाध्यक्ष देसाई रत्नागिरी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे कार्यकारिणी सदस्य साळवी अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

अशी माहिती विष्णू विशे "संपर्कप्रमुख ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक सेना" यांनी दिली.

No comments:

Post a Comment

टिटवाळा येथे महाराष्ट्र राज्य असंघटित बांधकाम कामगार संघटनेकडून कामगारांना घरगुती भांड्यांचा संच वाटप !!

टिटवाळा येथे महाराष्ट्र राज्य असंघटित बांधकाम कामगार संघटनेकडून कामगारांना घरगुती भांड्यांचा संच वाटप !! *कामगार कल्याण मंडळाच्या सहकार्याने...