Monday 15 November 2021

अखेर मुरबाड नगरपंचायतीचे रखडलेले आरक्षण आज जाहीर !! **पुन्हा एकदा मुरबाड नगरपंचायत वर येणार महिला राज **

अखेर मुरबाड नगरपंचायतीचे रखडलेले आरक्षण आज जाहीर !!
**पुन्हा एकदा मुरबाड नगरपंचायत वर येणार महिला राज **


मुरबाड, ( मंगल डोंगरे ) : गेल्या वर्षभरापुर्वी मुदत संपलेल्या मुरबाड नगरपंचायतीचे आरक्षण हरकती अभावी रखडले होते. मात्र आज निवडणूक आयोगाच्या आदेशाने व उपजिल्हाधिकारी पंकज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मुरबाड एम.आय.डी.सी. हाँल येथे चिठ्ठ्या टाकून काढण्यात आले. यावेळी मुरबाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ, नायब तहसीलदार प्रसाद पाटील हे उपस्थित होते.
        ओबीसी आरक्षणामुळे व मागील वर्षीच्या हरकतींमुळे मुरबाड नगरपंचायतीचे रखडलेले आरक्षण आज अखेर जाहीर झाले असुन, आजच्या या आरक्षण सोडतीमुळे ब-याच हौशी उमेदवारांच्या हौसेवर विरजन पडले आहे. तर मुरबाड नगरपंचायत वर पुन्हा एकदा महिलाराज विराजमान होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुरबाड नगरपंचायत मध्ये एकुण 17 प्रभाग असुन, 17 जागा निवडुन द्यावयाच्या असताना, त्यामध्ये 9 जागा आजच्या आरक्षणाने महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. तर उर्वरीत आठ जागांमध्ये पुरुषांसाठी एकही जागा आरक्षित नसुन, सहा जागा खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. तर ओबीसी प्रवर्गासाठी दोन जागा आरक्षित ठेवल्या आहेत. आज  जाहीर झालेले आरक्षण पुढील प्रमाणे असुन,  **प्रभाग क्रमांक - 1- सर्व साधारण महिला,,**
**प्रभाग क्रमांक - 2- ना.मा.प्र.महिला,,**
**प्रभाग क्रमांक - 3- सर्वसाधारण **
**प्रभाग क्रमांक - 4- अनुसूचित जाती महिला,**
**प्रभाग क्रमांक - 5- ना.मा.प्र.महिला, **
**प्रभाग क्रमांक - 6- सर्वसाधारण महिला,**
**प्रभाग क्रमांक - 7- सर्वसाधारण **
**प्रभाग क्रमांक - 8- सर्वसाधारण **
**प्रभाग क्रमांक - 9 - सर्वसाधारण **
**प्रभाग क्रमांक -10- सर्वसाधारण महिला**
**प्रभाग क्रमांक -11- सर्वसाधारण**
**प्रभाग क्रमांक -12- ना.मा.प्र.सर्वसाधारण**
**प्रभाग क्रमांक -13- सर्वसाधारण**
**प्रभाग क्रमांक -14- सर्वसाधारण**
**प्रभाग क्रमांक- 15- सर्वसाधारण महिला**
**प्रभाग क्रमांक -16- अ.जमाती महिला,**
**प्रभाग क्रमांक -17- ना.मा.प्र. सर्वसाधारण**
असे आरक्षण सोडतीद्वारे काढण्यात आले असून, अनेकांच्या नगरसेवक बनण्याच्या आशा मावळल्या आहेत. तर काही इच्छुकांना मोर्चे बांधणी साठी मैदान मोकळे झाले आहे.

No comments:

Post a Comment

रितिका भोसलेने दुबई इंटरनेशनल कराटे चैंपियन शिपमध्ये जिंकली दोन सुवर्ण पदक !!

रितिका भोसलेने दुबई इंटरनेशनल कराटे चैंपियन शिपमध्ये जिंकली दोन सुवर्ण पदक !! मुंबई,  (शांताराम गुडेकर ) :         बूड़ोकन कराटे ...