Monday 15 November 2021

कल्याणमधील बिर्ला शाळेबाहेर पालकांचं आंदोलन !!

कल्याणमधील बिर्ला शाळेबाहेर पालकांचं आंदोलन !!


कल्याण, ऋषिकेश चौधरी : कल्याण मधील प्रसिद्ध असलेल्या बिर्ला शाळेबाहेर आज पालकांनी फी वाढी विरोधात काळ्या फिती बांधून आंदोलन केले .बिर्ला शाळा प्रशासनाने यंदाच्या वर्षी 20 टक्के वाढ केली आहे, ही फी वाढ बेकायदेशीर असल्याचा आरोप पालकांनी करत शाळेबाहेरच ठिय्या आंदोलन करत शाळा प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. 


शाळेने फी वाढ मागे घ्यावी अशी मागणी केली. या आंदोलनानंतर शाळा प्रशासनाने आंदोलन करणाऱ्या पालकांना चर्चेसाठी बोलावलं. या चर्चेत शाळा प्रशासनाने ही वाढ मागे घेण्यास नकार दिल्याची माहिती पालकांनी दिली. त्यामुळे यापुढेही शाळे विरोधात आंदोलन करणार असल्याचं आपली भूमिका पालकांनी स्पष्ट केली. 


शाळेच्या या निर्णया विरोधात शिक्षण मंत्र्यांसह न्यायालयात धाव घेनार असल्याचा इशारा पालकांनी दिला. तर याबाबत  शाळा प्रशासनाने कोरोना काळात 2019 पासून आम्ही कोणतीही फी वाढ केली नव्हती. यंदा नियमानुसार फी वाढ केली आहे. ज्या पालकांची आर्थिक परिस्थिती नाही त्याना फी मध्ये सवलत देण्यात आली आहे तसेच चार ते सहा टप्प्यात फी भरण्याची मुभा दिली आहे. फी वाढी संदर्भात न्यायालयात प्रकरण असून न्यायालयाचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य असल्याचे शाळा व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment

!! प्रभो शिवराया !! - प्रासंगिक कविता (संतोष गावडे / पत्रकार - वृत्तपत्र लेखक)

प्रासंगिक कविता --------------------- !! प्रभो शिवराया !! झुकेल मस्तक सदैव अमुचे महाराज तुमच्या चरणी ते सुर्य चंद्र अन् तारे जोव...