Tuesday, 23 June 2026

शनिवार ,रविवार व सार्वजनिक सुटीच्या दिवशी खुलेआम होते बेकायदेशीर "गौण खनिज"ची चोरटी वाहतूक !!

शनिवार ,रविवार व सार्वजनिक सुटीच्या दिवशी खुलेआम होते बेकायदेशीर "गौण खनिज"ची चोरटी वाहतूक !!

संग्रहित फोटो - (वाळू तस्करी करताना डंपर मध्ये "जेसीबी"यंत्राच्या सहाय्याने वाळू भरताना)

भिवंडी, दिं, २३जून२०२६, अरुण पाटील (कोपर) :

भिवंडी तालुक्यातून शनिवार, रविवार या साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर खुलेआम बेकायदेशीर रित्या रेती बंदर येथून वाळू, व दगड खाणीतून दगड ,मातीची/ मुरुमाची रॉयल्टी "न "(स्वामित्व धन) भरता चोरून चोरटी वाहतूक होत असून या बाबतची माहिती काही महसूल व पोलीस अधिकार्यांना असून देखील कारवाई करत नसल्याने या मुळे शासनाचे या सुट्टीच्या दिवशी लाखो रुपयांचे महसूल बुडत असून याला जबाबदार असणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांवर ठोस कारवाई होणे गरजेचे असल्याचे नागरिकांन कडून बोलले जात आहे. 

सविस्तर वृत्त असे आहे कि, भिवंडी तहसीलदार अधिकार क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर दगड, माती खाणी आहेत. या खाण पट्ट्यातून दररोज हजारो ब्रास दगड, माती व मुरुम उत्खनन होत आहे. या पैकी काही ठिकाणी रॉयल्टी "न" (स्वामित्व धन) भरता बेकायदेशीर रित्या उत्खनन करून त्याची बेकायदेशीरपणे चोरटी वाहतूक होत असून या पैकी बहुतांश भाग हा "तालुका पोलिस" ठाणे व "नारपोली पोलिस" ठाण्याच्या हद्दीत येत आहे.

तसेच या तालुक्याला  मोठा खाडी किनारा लाभला आहे. त्या पैकी मंडळ अधिकारी - खारबाव यांच्या कार्य क्षेत्रातील केवणी रेती बंदर, काल्हेर रेती बंदर, कशेळी रेती बंदर व खारबाव खाडी या ठिकाणावरून वाळूची तस्करी मोठ्या प्रमाणावर होत आहे. या पैकी तलाठी सजा कोपर/ केवणी यांच्या अधिकारात येत असलेल्या केवणी रेती बंदर या ठिकाणावरून प्रतिबंध असलेल्या सक्शन पंपाद्वारे उत्खनन केलेली वळूची सर्वात जास्त तस्करी/चोरी व चोरटी वाहतूक होत असून ही वाहतूक "तालुका पोलिस" ठाणे व "नारपोली पोलीस" ठाणे यांच्या हद्दीतून होत आहे. 

तसेच अंजुर खाडी, कोन गाव रेती बंदर व इतर  खाडी पत्रातून देखील दररोज रात्री मोठ्या प्रमाणावर  बेकायदेशीर रित्या सक्शन पंपा द्वारे वाळू उत्खनन होत आहे. व नंतर ही वाळू येथील वाळू माफिया हे काही महसूल अधिकारी, काही पोलिस अधिकारी यांना हाताशी धरून आर्थिक व्यवहार करून शासनाची रॉयल्टी "न"(स्वामित्व धन) भरता  चोरटी वाहतूक करत आहेत. त्यामुळे बेकायदेशीर वाहतूक करणारे वाळू व दगड, माती माफिया हे तर गब्बर झालेच आहेत त्यांच्या बरोबरच काही पोलिस व महसूल अधिकारी देखील गब्बर झाले आहेत. 

मुख्य म्हणजे शानीवार, रविवार या साप्ताहिक व ईतर सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी  दिवस व रात्र खुले आम  मोठ्या प्रमाणावर चोरटी "गौण खनिज" वाहतुक सुरू असते त्यामुळे शासनाचे महसूल रूपाने या दिवसात लाखो/करोडो रुपयांचे महसूल बुडत आहे.त्यामुळे या बाबत वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे जातीने लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आवाहन नागरिकान कडून होत आहे. 

या वाळू तस्करांची/चोरांची दहशत इतकी आहे की,यांना पोलिस प्रशासन व महसूल विभागातील काही अधिकारी घाबरत असल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होत नाही. त्यामुळे सर्व सामान्य स्थानिक नागरिकही यांच्या विरोधात तक्रार देण्यास घाबरतात.जर कारवाई करायची असेल तर "तालुका पोलीस" ठाणे भिवंडी व महसूल खाते भिवंडी यांनी केवणी रेती बंदर येथे संध्याकाळी ७ वा. ते सकाळी ७ वाजे दरम्यान हायवा डंपरमध्ये "जेसीबी" यंत्राद्वारे वाळू भरणाऱ्या वाळू तस्करांवर छापा टाकून त्यांच्यावर कारवाई  करून यंत्र सामुग्री जप्त कारूनच दाखवावी असे आवाहन येथील स्थानिक नागरिकांनी या दोन्ही प्रशासनाला केले आहे. 

जर यदा कदाचित कारवाई झालीच तर ती येथील सक्शन पंपावर व बार्ज वर काम करणाऱ्या गरीब कामगारावरच करण्यात आल्याचे येथील ग्रामस्थ बोलत आहे. त्यामुळं आता वारंवार चोरीचा गुन्हा करून वारंवार वाळू तस्करी व चोरटी वाहतूक करणाऱ्यांवर वाहन चालकांवर जर कायद्यात तरतूद असेल तर त्यांच्यावर "मकोका"(महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा)अंतर्गत गुन्हा दाखल करावा व हायवा डंपर व वाळू भरून देणाऱ्या "जेसीबी" यंत्र जप्त करावेत असे सर्व सामन्यांचे मत आहे. 

त्यामुळे आता केवणी रेती बंदर येथून वाळू तस्करी करणारे केवणी व दिवे गावचे वाळू तस्कर कोण? यांची गोपनीय शोध मोहीम आता वरिष्ठ कार्यालया मार्फत सुरू झाली असून यात आरोप सिद्ध झाल्यास तस्करांवर "मकोका" (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) लागणार असल्याचे गोपनीय सूत्रांकडून समजले आहे.

No comments:

Post a Comment

शनिवार ,रविवार व सार्वजनिक सुटीच्या दिवशी खुलेआम होते बेकायदेशीर "गौण खनिज"ची चोरटी वाहतूक !!

शनिवार ,रविवार व सार्वजनिक सुटीच्या दिवशी खुलेआम होते बेकायदेशीर "गौण खनिज"ची चोरटी वाहतूक !! संग्रहित फोटो - (वाळू तस...