Monday, 22 June 2026

योगातून निरोगी जीवनाचा संदेश : उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा !!

योगातून निरोगी जीवनाचा संदेश : उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा !!

विरार प्रतिनिधी/ पंकज चव्हाण

विरारच्या विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट संचालित कै. पांडुरंग रघुनाथ पाटील उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून शनिवार दिनांक २० जून २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना निरोगी जीवनशैलीचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.

भारत सरकारच्या आयुष मंत्रालय यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रशिक्षित योगतज्ज्ञ श्रीमती रुपाली नाईक आणि प्रा. डॉ. महेंद्र घरत यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व, त्याचा इतिहास, प्राणायाम, ध्यानधारणा तसेच सूर्यनमस्कार यांचे सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली विविध योगासने आणि प्राणायामाचे प्रभावी प्रात्यक्षिक सादर करत प्रत्येक आसनाचा आपल्या शरीरावर त्याचा कसा फायदा होतो या बद्दल संक्षिप्त माहिती सर्व विद्यार्थ्यांना दिली. प्रशिक्षकांनी योग्य सराव सुनिश्चित करण्यासाठी वैयक्तिक लक्ष दिले.

या कार्यक्रमात इयत्ता बारावीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यक्रमास प्राचार्या श्रीमती चित्रा ठाकूर, उपप्राचार्या श्रीमती कुसुम नाईक, श्रीमती हेमा पाटील, उपप्राचार्य श्री रमेश पाटील, समन्वयक कल्पना राऊत
सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. स्वाती जयकर, डॉ. महादेव दिनकर तसेच विविध विभागांतील शिक्षकवृंद उपस्थित होते.

योग ही केवळ व्यायामपद्धती नसून शरीर, मन आणि आत्म्याचा समतोल साधणारी जीवनशैली आहे, हा संदेश या उपक्रमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि आरोग्यदायी भविष्यासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित करणारा हा कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरला.

सदर कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी संस्थेच्या सचिव अपर्णा ठाकूर तसेच संस्थेच्या सर्व विश्वस्तांचे मोलाचे सहकार्य लाभले. योगाच्या माध्यमातून आरोग्य, शिस्त आणि सकारात्मकतेचा संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजविणारा हा उपक्रम सर्वांच्या स्मरणात राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

No comments:

Post a Comment

कल्याण पूर्वेतील पाणी, रस्ते, आरोग्य प्रश्नावर आमदार सुलभा गायकवाड यांची आयुक्त अभिनव गोयल यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण पूर्वेतील पाणी, रस्ते, आरोग्य प्रश्नावर आमदार सुलभा गायकवाड यांची आयुक्त अभिनव गोयल यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्...