Monday, 22 June 2026

*वडोदरा-जेएनपीटी महामार्गावर एरंजाडजवळ भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, एक मुलगी गंभीर जखमी*

*वडोदरा-जेएनपीटी महामार्गावर एरंजाडजवळ भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, एक मुलगी गंभीर जखमी*

*बदलापूर, दि. २१, प्रतिनिधी* : वडोदरा-जेएनपीटी महामार्गावर एरंजाड गावाजवळ रविवारी पहाटे भीषण अपघात घडला. टिटवाळा दिशेकडून बदलापूरकडे भरधाव वेगाने येणाऱ्या बीएमडब्ल्यू कारचा चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावर आदळून पलटली. या अपघात एक पुरुष आणि एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून एका मुलीला गंभीर दुखापत झाली आहे.

*२५१ किमी वेगाने कार, चुराडा*  
प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात पहाटे सुमारे २ वाजण्याच्या दरम्यान घडला. रस्ता मोकळा असल्याने बीएमडब्ल्यू कार तब्बल २५१ किमी प्रतितास वेगाने धावत होती. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार थेट दुभाजकावर आदळली. धडकेची तीव्रता इतकी होती की बीएमडब्ल्यू कारचा अक्षरशः चुराडा झाला.

अपघातानंतर वाहनाचे सुटे भाग आणि मृत व्यक्तींच्या अवयवांचे तुकडे रस्त्यावर दूरपर्यंत विखुरले होते, असे घटनास्थळी मदतीसाठी धावलेल्या नागरिकांनी सांगितले. कारच्या धडकेचा आवाज परिसरात मोठ्या प्रमाणात ऐकू आल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

No comments:

Post a Comment

कल्याण पूर्वेतील पाणी, रस्ते, आरोग्य प्रश्नावर आमदार सुलभा गायकवाड यांची आयुक्त अभिनव गोयल यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण पूर्वेतील पाणी, रस्ते, आरोग्य प्रश्नावर आमदार सुलभा गायकवाड यांची आयुक्त अभिनव गोयल यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्...