Thursday, 3 September 2026

कल्याण पूर्वेतील पाणी, रस्ते, आरोग्य प्रश्नावर आमदार सुलभा गायकवाड यांची आयुक्त अभिनव गोयल यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण पूर्वेतील पाणी, रस्ते, आरोग्य प्रश्नावर आमदार सुलभा गायकवाड यांची आयुक्त अभिनव गोयल यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक !!

*कल्याण, प्रतिनिधी :* कल्याण पूर्व मतदारसंघातील पाणी, रस्ते, आरोग्य, स्वच्छता, सुरक्षा आणि प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनाशी संबंधित मूलभूत प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी आमदार सुलभा गायकवाड यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेऊन सविस्तर बैठक घेतली.

या बैठकीत नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्नांवर चर्चा करून प्रत्येक प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी कालबद्ध कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले.

*बैठकीतील प्रमुख मागण्या व निर्णय :*

*🔹 पाणी प्रश्न :* 27 गावांतील नागरिकांना पाणी जोडणीसाठी मालमत्ता कर पावतीची अट 2022 ऐवजी 2025 पर्यंत शिथिल करणे, आशेळे-माणेरे परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करणे, चिंचपाडा, द्वारली, नांदिवली, वसार येथील अमृत योजनेतील जलवाहिनी व जलकुंभाची कामे वेगाने पूर्ण करणे आणि वाढीव पाणी बिलांची तपासणी करून कपात करणे.

*🔹 रस्ते व स्वच्छता :* गणेशोत्सवापूर्वी सर्व मुख्य व अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती, सिद्धार्थनगर ते कल्याण स्टेशन स्कायवॉकची स्वच्छता व रंगरंगोटी, दुर्गाडी व उंबर्डे डंपिंग ग्राउंडवरील NACOF व ITCON कंपनीच्या कामाची चौकशी.

*🔹 आरोग्य व सार्वजनिक सुविधा :* 100 फुटी रोडवरील आरक्षण क्र. 283 मधील 30,000 चौ.मी. जागेवर अद्ययावत रुग्णालयासाठी निधी प्रस्ताव, आरक्षण क्र. 279 मधील क्रीडासंकुलाचे अधिग्रहण, सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती व स्वच्छता, चिंचपाडा 100 फुटी रोडवर नवीन शौचालय उभारणे.

*🔹 सुरक्षा व इतर :* भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त, नादुरुस्त CCTV दुरुस्ती, सार्वजनिक विहिरींवर लोखंडी जाळी बसवणे, खडेगोळवली प्रभाग कार्यालयात 24 तास अग्निशमन वाहन व स्वर्गरथ उपलब्ध करणे, दादासाहेब गायकवाड मैदानात खेळाडूंसाठी सुविधा, द्वारलीपाडा, वसार, नेवाळी नाका येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई.

तसेच कल्याण पूर्वसाठी नवीन शिधावाटप कार्यालयासाठी महापालिकेच्या वास्तूत जागा देणे, परिवहन उपक्रमातील 59 कायम कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवणे आणि महापालिकेचे गाळे महिला बचत गट व सेवाभावी संस्थांना नाममात्र दरात देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

"नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण होणे आणि कल्याण पूर्वचा नियोजनबद्ध विकास हीच आमची प्राथमिकता आहे. प्रश्न केवळ मांडणे नाही तर त्याचा पाठपुरावा करून तोडगा काढणे यासाठी प्रयत्न सुरू राहतील," असे आमदार सुलभा गायकवाड यांनी सांगितले.

यावेळी भाजयुमो जिल्हाध्यक्ष वैभव गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष संजय मोरे आणि महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

कल्याण पूर्वेतील पाणी, रस्ते, आरोग्य प्रश्नावर आमदार सुलभा गायकवाड यांची आयुक्त अभिनव गोयल यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण पूर्वेतील पाणी, रस्ते, आरोग्य प्रश्नावर आमदार सुलभा गायकवाड यांची आयुक्त अभिनव गोयल यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्...