Thursday, 3 September 2026

गोवंडी येथे कवी सुभाष आढाव यांच्या बालकविता संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन !!

गोवंडी येथे कवी सुभाष आढाव यांच्या बालकविता संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन !!

.                          कवी सुभाष आढाव (रा. गोवंडी, मुंबई)

*मुंबई : प्रतिनिधी*

मिरांश ममता मयूर आढाव यांच्या प्रथम वाढदिवसानिमित्त कवी सुभाष आढाव यांच्या ‘रानपाखरं’ या बालकविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

हा प्रकाशन सोहळा पत्रकार मधु कांबळे यांच्या हस्ते *मंगळवार दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी सायं. ४.०० वाजता श्री गोवंडी गावदेवी ट्रस्ट, बालवाडी, गोवंडी, मुंबई* येथे पार पडणार आहे.

या कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक बी. अनिल तथा अनिल भालेराव, नगरसेवक - गटनेता (बृ.मुं.म.पा.) विजय उबाळे, विजय पाटील (शिवसेना संपर्कप्रमुख, शिराळा-वाळवा विधानसभा), विलास कांबळे (विश्वस्त - कुमुद मेमोरियल फंड), सुनीता कोळी (सेवानिवृत्त मुख्याध्यापिका - कुमुद विद्यामंदिर मराठी प्राथमिक विभाग), डॉ. सत्तार खान (सरचिटणीस - मुंबई काँग्रेस, रोजगार व स्वयंरोजगार विभाग), ॲड. प्रफुल्ल चव्हाण (अधिवक्ता, उच्च न्यायालय), जे. के. कांबळे (संपादक - महाराष्ट्र सिव्हिल टाईम्स), सागर तायडे (अध्यक्ष - स्वतंत्र मजदूर युनियन), भिमसेन तपासे (संस्थापक - लुम्बिनी वृक्ष संवर्धन समिती) यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

अनेक मान्यवर साहित्यिक, कवी आणि साहित्यप्रेमी यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा दिमाखदार स्वरूपात पार पडणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीर संभाजी भोरे करणार आहेत.

कार्यक्रमाचे निमंत्रक ॲड. मयूर सुभाष आढाव, ममता मयूर आढाव, विवेक सुभाष आढाव यांनी वाचक-रसिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment

कल्याण पूर्वेतील पाणी, रस्ते, आरोग्य प्रश्नावर आमदार सुलभा गायकवाड यांची आयुक्त अभिनव गोयल यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण पूर्वेतील पाणी, रस्ते, आरोग्य प्रश्नावर आमदार सुलभा गायकवाड यांची आयुक्त अभिनव गोयल यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्...