Sunday, 21 June 2026

रायगड जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष समाधान म्हात्रे यांचे अवैध व अमली पदार्थच्या तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !!

रायगड जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष समाधान म्हात्रे यांचे अवैध व अमली पदार्थच्या तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !!

** कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा प्रशासनाचा इशारा.

उरण, (विठ्ठल ममताबादे) : जेएनपीटी बंदरातून होणारी अवैध ई-सिगारेट, अमली पदार्थ व इतर प्रतिबंधित वस्तूंची तस्करी रोखून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा दि. २५ जुलै २०२६ रोजी जेएनपीटी बंदरावर आमरण उपोषण आंदोलन करण्याचा इशारा पत्रव्यवहाराद्वारे रायगड जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष समाधान म्हात्रे यांनी प्रशासनाला दिला आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी रायगड यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन सुद्धा दिले आहे.जेएनपीटी बंदरातून होणारी अवैध ई-सिगारेट, अमली पदार्थ व इतर प्रतिबंधित वस्तूंची तस्करी रोखून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी या संदर्भात जिल्हाध्यक्ष समाधान म्हात्रे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस अधीक्षक रायगड, जेएनपीए अध्यक्ष,सीमा शुल्क आयुक्त न्हावा शेवा,महसूल गुप्तचर संचालनालय या ठिकाणी सुद्धा पत्रव्यवहार केला आहे.

समाधान म्हात्रे यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की रायगड जिल्हा तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अमली पदार्थाचे सेवन, खरेदी-विक्री, रेव्ह पार्टी आणि विविध प्रकारच्या व्यसनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यामुळे युवक, विद्यार्थी आणि नव्या पिढीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून समाजासमोर गंभीर सामाजिक व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

अलीकडेच प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, जेएनपीटी (जवाहरलाल नेहरू बंदर) येथे फर्निचरच्या नावाखाली आयात करण्यात आलेल्या कंटेनरमधून तब्बल ९२.८० कोटी रुपये किंमतीच्या सुमारे १.१६ लाख प्रतिबंधित इलेक्ट्रॉनिक सिगारेट (व्हेप्स) जप्त करण्यात आल्या आहेत. सदर कारवाई महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) व सीमाशुल्क विभागाने केली असल्याचे वृत्तात नमूद आहे. फर्निचर असल्याचे घोषित केलेल्या मालामध्ये ई-सिगारेट लपवून तस्करी करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

ही घटना अत्यंत गंभीर असून बंदरातून अवैध माल देशात कसा प्रवेश करतो, याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर तस्करीचा प्रयत्न होत असताना संबंधित व्यापारी, आयातदार, क्लिअरिंग एजंट, बंदरातील अधिकारी व इतर संबंधित घटकांची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. तसेच अशा मालाला परवानगी देणारे किंवा दुर्लक्ष करणारे अधिकारी यांचीही जबाबदारी निश्चित करून त्यांच्या संपत्तीची व आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यात यावी.अशी मागणी समाधान म्हात्रे यांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास अथवा तस्करी करणाऱ्या संबंधितांवर त्वरित कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र  पवार पक्षाचे रायगड युवक जिल्हाध्यक्ष समाधान म्हात्रे यांनी प्रशासनाला दिला आहे

No comments:

Post a Comment

*वडोदरा-जेएनपीटी महामार्गावर एरंजाडजवळ भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, एक मुलगी गंभीर जखमी* *बदलापूर, दि. २१, प्रतिनिधी* : वडोदरा-जेएनपीटी...