Wednesday, 24 November 2021

युवा सेनेतर्फे पोलिस खेळाडूंना ट्रॅक सूट वाटप !!

युवा सेनेतर्फे पोलिस खेळाडूंना ट्रॅक सूट वाटप !!


जळगाव, बातमीदार :  महाराष्ट्रचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे आदेशाने व युवासेना सचिव कॉलेज कक्ष प्रमुख वरुण सरदेसाई व पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे मार्गदर्शनाख़ाली व विस्तारक कुणाल दराडे व किशोर भोंसले यांचे संकल्पनेतून आज मंगळवारी दि. २३ नोव्हेंबर रोजी जळगांव ज़िल्हा येथील युवा सेना जळगाव जिल्हातर्फे शहरातील पोलीस खेळाडू बांधवांना ट्रॅक सूटचे वाटप करण्यात आले. यावेळी युवा सेनेचे जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते. 


पोलीस बांधवांच्या कर्नाटक राज्यातील मेंगलोर येथे राष्ट्रीय जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात आले आहेत. त्या स्पर्धांमध्ये जळगावचे पोलीस सहभागी होत आहेत. यामध्ये शहर पोलीस ठाण्याचे कमलेश भगवान पाटील, जामनेर पोलीस ठाण्याचे संदीप विठ्ठल पाटील, भुसावळ शहरचे जितेंद्र संतोष सोनवणे, जळगाव तालुकाचे भूषण रतिलाल सपकाळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पंकज रामचंद्र शिंदे हे स्पर्धेत सहभागी झाले आहेत. 


त्यांच्यासह प्रशिक्षक कमलेश नगरकर यांना युवा सेनेचे पियुष संजयकुमार गांधी यानी ट्रॅक सूट उपलब्ध करून दिले व स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी युवा सेनेचे जिल्हा युवा अधिकारी शिवराज पाटील, राज्य युवासेना सहसचिव विराज कावडीया, उपजिल्हा युवा अधिकारी पियुष गांधी, महानगर युवा अधिकारी विशाल वाणी, स्वप्निल परदेशी, शहर युवा समन्वयक संकेत कापसे, निलेश सपकाले विद्यापीठ युवा अधिकारी अंकित कासार, तेजस दुसाने, यश सपकाले, जय मेहता, गौरव जैन, परेश चोपडा, पंकज पाटील, रोहित शिरसाठ, सचिन बोरसे, विशाल परदेशी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

गेल ओम्वेट आणि भारत पाटणकर यांच्या जीवनप्रवासावर आधारित माहितीपट 14 डिसेंबरला कोल्हापूरमध्ये प्रदर्शित !!

गेल ओम्वेट आणि भारत पाटणकर यांच्या जीवनप्रवासावर आधारित माहितीपट 14 डिसेंबरला कोल्हापूरमध्ये प्रदर्शित !! ** Gail & Bharat (2025) दिग्दर...