Sunday, 26 December 2021

स्वातंत्र्य लढ्यातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे योगदान न विसरण्याजोगे... कॉम्रेड अमृत महाजन !!

स्वातंत्र्य लढ्यातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे योगदान न विसरण्याजोगे...  कॉम्रेड अमृत महाजन !!


चोपडा, बातमीदार.. भारतीय स्वातंत्र्याची लढाई 1916 सालच्या खिलाफत आंदोलनापासून जोर धरत धरत पुढे काँग्रेसमध्ये महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाचा उदय झाला. 


नंतर 1920 सालचे असहकार आंदोलन लगोलग.. आयटक ची स्थापना नंतर पुढे भारतीय कम्युनिस्ट पक्षाची 26 डिसेंबर 1925 रोजी स्थापना झाली. 1947 सालापर्यंत कम्युनिस्टांनी काँग्रेस अंतर्गत काँग्रेस सोशलिस्ट ग्रुप म्हणूनच काम केले व कामगार शेतकऱ्यांची शोषण मुक्ती वर्गीय लढाया करत असताना ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्य लढाईत ही हिरीरीने भागीदारी केली ..भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेचे ब्रिटिशांनी तर एवढा धसका घेतला की, त्यांनी कम्युनिस्ट नेत्यांवर  कानपुर कट, मीरत कटानचे खटले भरून.. एम एन रॉय, कॉ. श्रीपाद अमृत डांगे, पि सी जोशी, डॉक्टर अधिकारी, एस एस मिरजकर शौकत उस्मनी, मुज्जफर अहमद बी, टी रणदिवे, नंबुद्रीपाद, आदी नेत्यांना दीर्घकाळ तुरुंगवास शिक्षा ठोठावल्या. त्यात 2 ब्रिटिश नागरिकही होते पण कम्युनिस्ट डगमगले नाहीत त्यांनीच 1930 साली लाहोर काँग्रेस अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मांडला अशा तऱ्हेने कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेने भारतीय स्वातंत्र्य चळवळीला नाव आयाम दिला आणि पुढे राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचे नेतृत्वात देशाला स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेले स्वातंत्र्य, विश्वबंधुत्व, समता या त्रिसूत्री चे संविधान साऱ्या देश वाशियांनी स्वीकारली. स्वातंत्र्य चळवळीतील भागीदारी या त्याग व संघर्ष या परंपरेचा हा इतिहास कोणी विसरू शकत नाही असे प्रतीपादन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड अमृत महाजन यांनी पक्षाच्या 97 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने चोपडा येथे आयोजित कार्यकर्ता बैठकीत केले. बैठकीपूर्वी पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते कॉम्रेड वासुदेव कोळी यांच्या हस्ते महात्मा फुलेनगर मध्ये विळा हातोडा चिन्हांकित लाल झेंडा अनावरण करण्यात आला व जोरदार घोषणाबाजी ही करण्यात आली त्यावेळी कॉम्रेड शांताराम पाटील गोरख वानखेडे, प्रकाश रल, सुमनबाई माळी, श्री दिगंबर माळी, बाळू लोहार, झाकिर अनेक मान्यवर कार्यकर्ते हजर होते.

No comments:

Post a Comment

तळघर ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री लक्ष्मी नारायण मंदिर जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा तसेच पालखी सोहळ्याचे आयोजन !!

तळघर ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री लक्ष्मी नारायण मंदिर जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा तसेच पालखी सोहळ्याचे आयोजन !! ...