Saturday, 25 December 2021

मयत शिक्षकांच्या स्मरणार्थ आणि शासनाच्या निषेधार्थ आझाद मैदानावर शिक्षकांनी केले मुंडण आंदोलन !!

मयत शिक्षकांच्या स्मरणार्थ आणि शासनाच्या निषेधार्थ आझाद मैदानावर शिक्षकांनी केले मुंडण आंदोलन !!


        बोरघर / माणगांव, ( विश्वास गायकवाड ) : कोरोना काळात तसेच पेंशन नसल्यामुळे भविष्याच्या चिंतेतून बहुसंख्य शिक्षक मयत झाले आहेत. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू व्हावी तसेच मयत शिक्षकांच्या पाल्यांना त्याचा लाभ मिळावा यासाठी आझाद मैदानावर दि.23 डिसेंबर पासून महाविश्वास धरणे आंदोलन सुरू आहे. आज या आंदोलनाचा 4 था दिवस असूनही सरकारने कोणतीच दखल न घेतल्यामुळे मयत शिक्षकांच्या स्मरणार्थ व शासनाच्या निषेधार्थ शिक्षक बांधव आज मुंडन केले आहे अशी माहिती शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्षा सौ. संगीताताई शिंदे यांनी दिली आहे. 

मुंडण करणाऱ्या शिक्षकांमध्ये श्री. संभाजी पाटील जळगाव, श्री.श्रीधर गोंधळी कोल्हापूर, सुदेश जाधव कोल्हापूर, अजित गणाचारी कोल्हापूर, राजमोहोम्मद देसाई, जी.आर पाटील उस्मानाबाद , नागेश पाटील कोल्हापूर, पंडित पाटील जालना, किसन गांगुर्डे इगतपुरी, मारुती वाघमारे बीड यांनी मुंडण केले. आझाद मैदानावर सुरू असलेल्या धरणे आंदोलना दरम्यान शिक्षक बांधवांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.हे शेवटचे आंदोलन असून पेंशन मिळाल्या शिवाय कोणत्याही परिस्थितीत आझाद मैदान सोडणार नाही. न्याय मिळणे हा आपला हक्क आहे व तो आपल्याला मिळालाच पाहिजे. आता जास्त दिवस लढण्याची आवश्यकता नसून लवकरच आपल्याला आपले हक्क मिळतील. 

कोरोना काळात बहुसंख्य शिक्षक मयत झाले आहेत. बहुसंख्य शिक्षक सेवानिवृत्त झाले असून त्यांना कुठल्याही प्रकारचा एक रुपया सुद्धा मिळत नाही. मयत शिक्षकांच्या स्मरणार्थ व शासनाच्या निषेधार्थ हे मुंडन आंदोलन केले आहे. 

1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व टप्याटप्यानेअनुदानावर शाळेतील कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय हक्काच्या लढाईसाठी आझाद मैदानावर या असे भावनिक आवाहन जुनी पेशवे संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष संभाजी पाटील यांनी केले आहे.. बरेच कर्मचारी अजूनही घरीच आहेत. नैतिकता ठेवून व आपल्या न्याय हक्कासाठी सोमवारी आझाद मैदानावर आत्मदहन आंदोलनात सहभागी व्हावे. राज्यातील 25 हजार कर्मचारी असून अजूनही निम्मे कर्मचारी उपस्थित नाहित हि शोकांतिका आहे असे सांगत त्यांनी कर्मचाऱ्यांना आझाद मैदानावर येण्यासाठी आवाहन केले.

No comments:

Post a Comment

तळघर ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री लक्ष्मी नारायण मंदिर जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा तसेच पालखी सोहळ्याचे आयोजन !!

तळघर ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री लक्ष्मी नारायण मंदिर जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा तसेच पालखी सोहळ्याचे आयोजन !! ...