Thursday, 23 December 2021

भिवंडीत, पत्नीवर जादूटोणा केल्याच्या संशयावरून चाकूने सपासप वार करून आरोपी पतीचे पलायन.!!

भिवंडीत, पत्नीवर जादूटोणा केल्याच्या संशयावरून चाकूने सपासप वार करून आरोपी पतीचे पलायन.!!


भिवंडी, दिं,23, अरुण पाटील (कोपर) : आपल्या पत्नीवर  कोणीतरी जादूटोणा केला असावा, त्यामुळेच ती आपल्याला त्रास देत आहे. या संशयातून एका तरुणाने आपल्या पत्नीवर घरातील धारदार चाकून सपासप वार करून घरात गंभीर जखमी अवस्थेत सोडून  आरोपी पतीने घरातून पलायन केले आहे. या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पतीचा शोध घेतला जात आहे. संबंधित घटना मंगळवारी रात्री घडली आहे. या पूर्वीही अशाच प्रकारे "जादूटोणा"चा प्रकार भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही महिन्यापूर्वी घडाला होता.
            कुरेशा इरफान शेख असं हल्ला झालेल्या महिलेचं नाव आहे. तर इरफान रफिक शेख असं हल्ला करून फरार झालेल्या आरोपी पतीचं नाव आहे. फिर्यादी आणि आरोपी दोघंही भिवंडी परिसरातील करवली गावातील एका चाळीत राहतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी इरफान शेख याला दारूचं व्यसन आहे. दारू पिऊन घरी आल्यानंतर तो किरकोळ कारणातून नेहमी आपल्या पत्नीसोबत वाद उकरून काढत असतो.
         घटनेच्या दिवशी देखील आरोपीनं दारूच्या नशेत पत्नीला शिवीगाळ केली होती. तसेच 'तुझ्यावर कोणीतरी जादूटोणा केला आहे, त्यामुळे तू मला त्रास देत आाहेस' असा आरोपही पतीने यावेळी केला होता. यामुळे पती पत्नीमध्ये कडाक्याचं भांडण झालं. हाच राग मनात धरून आरोपी पतीने पत्नीला ठोशा बुक्क्यांनी मारहाण केली. मारहाण होतं असताना, पीडित महिलेनं आरोपीचा हात पकडला. हात पकडल्याच्या कारणातून संताप अनावर झाल्याने आरोपीनं स्वयंपाक घरातील चाकू घेऊन येत पत्नीवर सपासप वार केले आहे.
       आरोपीनं पत्नीच्या गळ्यावर आणि डाव्या हातावर चाकुने वार करत हत्येचा प्रयत्न केला आहे. यानंतर पत्नीला जखमी अवस्थेत सोडून आरोपीनं घटनास्थळावरून पोबारा केला आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे. जखमी महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. या घटनेचा पुढील तपास भोईवाडा पोलीस करत आहेत.

No comments:

Post a Comment

चाळीसगावात गोदा नर्मदा जल यात्रेचे भव्य स्वागत: आमदार मंगेशदादांच्या नेतृत्वाखाली मिरवणूक !! *चाळीसगाव, दि. 23 एप्रिल 2026* गोदा नर्मदा जल य...