कोविड १९ च्या पाश्र्वभूमीवर प्रयोगात्मक कलेवर अवलंबून असलेल्या कलाकारांना अर्थसहाय्याकरिता अर्ज करण्याचे अवाहन !!
कल्याण, (संजय कांबळे) : महाराष्ट्र राज्यातील संघटित व असंघटित क्षेत्रातील पुर्णवेळ कलेवर गुजराण असणारे कलाकार यांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार तालुक्यातील कलाकारांनी विहित नमुन्यात तहसीलदार यांच्याकडे अर्ज करावे असे अवाहन कल्याण पंचायत समितीने केले आहे.
कोविड १९ या संकटामुळे अनेकांचे रोजगार गेले, बहुतेकांवर उपासमारीची वेळ आली होती. यामध्ये कलाकारांचाही समावेश होता. प्रयोगात्मक कलेवर अवलंबून असलेल्या यामध्ये तमाशा, खडीगंमत, वासुदेव, पोतराज, चित्रकथा, बहुरूपी, किर्तनकार, प्रबोधनकार, वारकरी संप्रदायाचे तसेच स्थानिक ठिकाणी आढळणारे प्रयोगात्मक कलाप्रकारातील केवळ कलेवर उदरनिर्वाह असणारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील कलाकार यांचा समावेश आहे.
त्यामुळे शासनाने अशा कलाकारांना अर्थसहाय्य करण्याचा निर्णय घेतला आहे. याकरिता विहित नमुन्यात अर्ज १५ वर्षे वास्तव्य, वार्षिक उत्पन्न ४८ हजारचा दाखला, आधारकार्ड, बँकेचे पासबुक छांयाकित प्रत, आदी कागदपत्रे सह कलाकारांनी सादर केलेल्या कलेची सविस्तर माहिती, ठिकाण, साहित्य, कलाक्षेत्रातील पुरावे, प्रकाशित साहित्य, कात्रणे, कलावंताच्या कार्यक्रमाची छायाचित्रे, वृतपत्रे बातम्या, आकाशवाणी, दुरदर्शन वरील कार्यक्रमाचे पुरावे,निमंत्रण पत्रिका, प्रशिस्तीपत्रक ज्यात अर्जदाराचा उल्लेख, अशा शासकीय अभिलेख च्या छांयाकित प्रती, इत्यादी कागदपत्रे अर्जासोबत जोडून तहसीलदार कल्याण यांच्या कडे १ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी २०२२ पर्यंत पाठवावे असे अवाहन कल्याण पंचायत समितीच्या समाजकल्याण विभागाने केले आहे.
No comments:
Post a Comment