कै. गजानन हिरु पाटील शाळा अटाळी येथे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन !!
कल्याण, संदीप शेंडगे : अटाळी येथील कैलास वाशी गजानन हिरो पाटील शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात संपन्न झाला.
मुलांना सातत्याने प्रश्न पडायला पाहिजे, त्या प्रश्नांची उत्तरं शोधायला पाहिजे, म्हणजेच आपण विज्ञानाच्या जवळ जाऊन नवनवीन प्रयोग करायला शिकू असे उद्गार आंबिवली येथील कै. गजाजन पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक गणेश पाटील सर यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित शाळेतील कार्यक्रमात काढले.
यावेळी मुलांनी छोटे छोटे प्रयोग स्वतः तयार करून सादर केले. शेतीसाठी पाणीपुरवठा करणे, जलचक्र, पाण्याचा पृष्ठीय ताण, ज्वलनासाठी ऑक्सिजनची गरज, ओला कचरा सुका कचरा, पाण्यात विरघळणारे पदार्थ व न विरघळणारे, असे छोटे छोटे प्रयोग विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात मांडले होते. मूत्राशय, चेतापेशी, त्वचेची रचना, मानवी डोळा, मेंदूची रचना तसेच अनेक विविध प्रयोग विद्यार्थ्यांनी मांडले होते. यावेळी मुख्याध्यापिका मीनल पाटील, जनार्दन पाटील, अल्पेश पाटील, तृप्ती मॅडम माधुरी चव्हाण तसेच सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी यांनी खूप मेहनत घेतली.
No comments:
Post a Comment