Saturday, 30 April 2022

ग्लोबल खान्देश महोत्सवास नागरीकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद...! *शाहिर शिवाजीराव पाटील यांना मानाचा खान्देश भूषण पुरस्कार प्रदान*

ग्लोबल खान्देश महोत्सवास नागरीकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद...!

*शाहिर शिवाजीराव पाटील यांना मानाचा खान्देश भूषण पुरस्कार प्रदान*


कल्याण, ( मनिलाल शिंपी ) : ग्लोबल खान्देश  महोत्सवास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. मुंबई विद्यापीठ उपकेंद्र वसंत व्हॅली समोर खडक पाडा येथे ग्लोबल खानदेश महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात सुमधुर सूरेल संगीत कार्यक्रमाने झाली. स्थानिक माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या हस्ते छत्रपती महाराजांच्या प्रतिमांचे पूजन झाले. 


खान्देशी माणूस प्रचंड मेहनती आहे, जिद्दी आहे, महत्वाकांक्षी आहे. कल्याणच्या चौफेर आणि चतुरस्त्र विकासात खान्देशी माणसांचे मोठे योगदान आहे असे प्रतिपादन त्यांनी याप्रसंगी केले. खान्देश ग्लोबल महोत्सव हा माझ्यावर निस्वार्थ व निरपेक्ष पणे प्रेम करणा-या  खान्देशी परीवाराचा कार्यक्रम आहे. त्यामुळे मी शुभचिंतक म्हणून सर्वातोपरी सहकार्य करण्याचे, त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहीन असंमाजी आमदार  नरेंद्र पवार यांनी दिले. उत्तरोत्तर खान्देश महोत्सव उंचीची नवनवीन क्षितीजे गाठीत आहे. मनोरंजन असो की करमणूक, खरेदी असो की विक्री, खवैय्यांची गर्दी असो की दर्दी रसिक प्रेक्षकांची गर्दी असो. पण आनंद आणि उत्साहाचं एक केंद्र बनलं आहे. 


महोत्सवाचे स्वागताध्यक्ष सुनील भाऊ चौधरी, अशोक गुंजाळ (माजी नगरसेवक अंबरनाथ), कल्पना महिला बालकल्याण समिती अंबरनाथचे कल्पना गुंजाळ, रोहिदासजी पाटील, बापूसाहेब हटकर, एल आर पाटील, ए.जी.पाटील, प्रदिप अहिरे, नगरदेवळा येथील समाजभूषण शिवशाहीर शिवाजीराव पाटील यांना अत्यंत प्रतिष्ठेचे मानला जाणारा ‘खान्देश भूषण’  पुरस्काराने सन्मानित करण्यात आला त्यांनी त्यांच्या दमदार खणखणीत आवाजात सुंदर पोवाडे, दर्जेदार अहिराणी गीते सादर करुन रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आणि तालावर थिरकायलाही लावलं. बांधकाम व्यवसायिक उद्दोजक निखिल चौधरी, सिनेफिल्म सृष्टीतील कलाकार यांनाही सन्मानित करण्यात आले.


याप्रसंगी किशोर पाटील, तुरुकमाने, विश्वनाथ पाटील, यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचं बहारदार सूत्रसंचालनाची जबाबदारी कु. वैदेही पाटील, वर्षा पाटील, विनोद शेलकर यानी समर्थपणे सांभाळली. उपस्थितांचे आभार दिपक पाटील यांनी मानले.

No comments:

Post a Comment

शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून राजकारण संपवण्याचा प्रयत्न.....

शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून राजकारण संपवण्याचा प्रयत्न..... नालासोपारा, प्रतिनिधी :-  शि...