शिष्यवृत्तीचे 1058 अर्ज महाविद्यालयांकडे प्रलंबित !!
*अर्ज निकाली काढण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन
बुलडाणा, बातमीदार : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तसेच बहुजन कल्याण, इतर मागास विभागामार्फत प्रत्येक वर्षी अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागास प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती आणि राज्य शासनाची शिक्षण, परिक्षा शुल्क या योजनांचा लाभ देण्यात येतो. सदर योजने अंतर्गत महाडिबीटी प्रणालीवर विदयार्थ्यांनी ऑनलाईन केलेले अर्ज महाविदयालय स्तरावर पाठविले जातात. महाविदयालयाने त्यांच्या स्तरावर प्राप्त अर्जांची तपासणी करून शिष्यवृत्तीकरिता पात्र अर्ज या कार्यालयास पाठविणे आवश्यक आहे. तसेच त्रृटी असलेले अर्ज विदयार्थ्यांच्या लॉगीनला परत करणे आवश्यक आहे. मात्र वारंवार सुचना देवुनही बुलडाणा जिल्हयातील 1058 विदयार्थ्यांचे अर्ज महाविदयालय स्तरावरच प्रलंबित आहेत.
त्यानुसार प्रलंबित अर्ज असलेल्या महाविद्यालयांनी अनु जती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांचे महाविदयालय स्तरावर प्रलंबित असलेले अर्ज तपासणी करून पात्र अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण बुलडाणा यांच्या लॉगीनला तात्काळ पाठविण्यात यावे व त्रुटी असलेले अर्ज त्रुटींची पुर्ततेकरिता विदयार्थी लॉगीनला परत करावे, अन्यथा मागासवर्गीय विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती पासून वंचित ठेवल्याप्रकरणी नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल.
तरी जिल्हयातील सर्व कनिष्ठ व वरिष्ठ महाविदयालयांनी आपल्या महाविद्यालयातील मागासवर्गीय विदयार्थी शिष्यवृत्ती लाभापासुन वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याची जबाबदारी प्राचार्य यांची राहील याची नोंद घ्यावी. महाविदयालयांनी त्यांच्या स्तरावरिल प्रलंबित अर्ज संख्या तात्काळ निकाली काढण्याचे आवाहन डॉ. अनिता राठोड, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, बुलडाणा यांनी केले.
No comments:
Post a Comment