महापालिकेच्या पर्यावरण व प्रदुषण नियंत्रण विभागामार्फत " दि. ५ जुन जागतिक पर्यावरण दिनानिमित्त माझी बाग, माझा परिसर या फोटोग्राफी स्पर्धेचे " आयोजन !!
कल्याण : दि.०५ जूनच्या जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतर्फे " माझी बाग माझा परिसर " या विषयाच्या अनुषंगाने फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
ही स्पर्धा मुख्यतः हवामान बदलाचा सामना करण्यासाठी आणि शहराचे हरित आच्छादन वाढवण्यासाठी आयोजित केली जात आहे. तरी सर्व नागरिकांनी स्पर्धेत सहभागी होऊन ,ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी आपला पाठिंबा दर्शवावा यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित / आवाहन करण्यात येत आहे .
सदर स्पर्धेमध्ये आपल्या बाल्कनी / बंगल्याचे आवार/सोसायटीच्या टेरेसवर तसेच सोसायटीच्या आवारामधील बागेचे फोटो, लोकेशन व स्वत:च्या फोटोसह दि २३ /०५/२०२२ पासून ते दि. २९ /०५/२०२२ पर्यंत पाठवायचे आहेत.
सदरील स्पर्धेमधील विजेत्यास महानगरपालिकेतर्फे स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्रक देण्यात येईल.
यात प्रथम - स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्रक
द्वितीय - स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्रक
तृतीय - स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्रकाचा समावेश असेल.
हे फोटो पालिकेच्या सोशल मीडिया हँडलवर देखील प्रकाशित केले जातील.
फोटो/फॉर्म सबमिट करण्याची शेवटची तारीख: २९ मे २०२२, १७.०० वाजेपर्यत असेल.
स्पर्धेच्या नियम व अटी पुढील प्रमाणे आहेत: -
१. बाग ही कल्याण डोंबिवली क्षेत्रातील असावी.
२. प्रति व्यक्ती नोंदींची संख्या एक पर्यंत मर्यादित राहील.
३ . सार्वजनिक उद्यान, रोपवाटिका, रस्त्याच्या कडेला वृक्ष लागवडीच्या सहभागाच्या नोंदी अपात्र ठरवल्या जातील.
४. ज्युरी सदस्यांनी / परिक्षकांनी घेतलेले सर्व निर्णय अंतिम असतील.
सूचना: -
१. अपलोड करता येणार्या चित्रांची कमाल संख्या प्रति एंट्री फक्त ०३ असेल.
२. अपलोड करता येणार्या चित्रांची कमाल क्वालिटी १० मेगा बाईट असेल. सदर फोटोग्राफी स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी कृपया खालील दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्यावी.
https://forms.gle/CH2ZgRTiWJmFAXMFA
तसेच काहि शंका /अधिक माहितीसाठी, कृपया
kdmc.cc2021@gmail.com वर मेल करावा.
सौजन्य - KDMC Facebook page
No comments:
Post a Comment