Monday 30 May 2022

शेतकऱ्यांचे प्रश्नावर किसान सभा एल्गार पुकारणार *राज्य अधिवेशनात जळगाव जिल्ह्याचा भरीव सहभाग*

शेतकऱ्यांचे प्रश्नावर किसान सभा एल्गार पुकारणार *राज्य अधिवेशनात जळगाव जिल्ह्याचा भरीव सहभाग* 


चोपडा, बातमीदार..  अखिल भारतीय किसान सभाचे ३० वे राज्य अधिवेशन २८/२९ मे रोजी शिरपुरला '२८ जिल्ह्यांतील २३८ प्रतिनिधींच्या' भरभक्कम भागीदारीत पार पडले. 


अधिवेशनाची सुरुवात २८ मे ला प्रचंड रॅली नंतर न भूतो अशी जाहीर सभा झाली. नंतर स्मिता पाटील टाऊन हॉल (कॉ. नामदेव गावडे सभागृह) मध्ये दीड दिवस शेतकऱ्यांची गत काळातील आंदोलने प्रश्नांवर चर्चा झाली २९ मे रोजी दुपारी ३ वाजता अधिवेशनाचा प्रेरणादायक समारोप झाला. 



किसान सभेचे राष्ट्रीय सचिव कॉ. अतुलकुमार अंजान, भाकप राष्ट्रीय सचिव कॉ. भालचंद्र कांगो, राज्य सचिव तुकारामजी भस्मे यांनी मार्गदर्शन केले. २२ मागण्यांचे ठराव करण्यात येऊन ७ जून पासून संघर्ष करण्याचा निर्णय घेणे आला रॅलीसाठी जळगाव जिल्ह्यातून विशेषतः चोपडा, जळगाव, अमळनेर, एरंडोल, यावल, चाळीसगाव या तालुक्यातून १५ प्रतिनिधी सहभागी झाले होते. त्यात किसान सभेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी दौलत पाटील, सल्लागार अमृत महाजन, लक्ष्मण शिंदे,  दिलीप महाजन, गंभीर महाजन, एकनाथ महाजन, रमेश पाटील, काळू कोळी, कॉ. एरंडे या सक्रिय प्रतिनिधींचा समावेश होता या अधिवेशनाला शेतकऱ्यांनी चांगला आर्थिक सहभाग ही दिला. 


राज्याच्या किसान सभेचा ठसा बऱ्यापैकी उमटला.. या अधिवेशनात ८७ शेतकरी कार्यकर्ते पदाधिकारी यांची कार्यकारिणी निवडण्यात आली राज्य अध्यक्ष कॉम्रेड ॲड.  हिरालाल परदेशी, धुळे व सचिव राजन क्षीरसागर परभणी यांचे नेतृत्वात ही कार्यकारिणी काम करणार आहे. तीत जळगाव जिल्ह्यातून दिलीप चौधरी विखरन, ता. एरंडोल यांना संधी मिळाली या अधिवेशनात खालील ठराव पास करण्यात आले :- १) शेती मालाला किमान पूरक हमी भाव ध्या, २) वन्य प्राण्यापासून शेतकऱ्यांची पिकाची नासाडी थांबवणेसाठी वनखात्याने उपाय योजना करावी काटेरी कुंपण उभारावे नुकसानीची एकरी ५०००₹ भरपाई द्यावी. ३) चोर्टकी धरणाची उंची वाढवावी. ४) जळगाव जिल्ह्यातील कांदा खरेदी साठी नाफेड चे केंद्र उभारावे. ५) सोयाबीन ला १०००₹भाव ध्या ६) शेतकऱ्यांना खाते बी बियाणे औषधी साहित्य खरेदी जी एस टी मुक्त करा, ७) पेट्रोल डिझेल दर जी एस टी कक्षेत घ्या ८) आदिवासींचे वणपत्ते नावे करा ९) उसाला ४०००₹ एफआरपी दर द्या, १०) केळीला बोर्डा प्रमाणे भाव द्या ११) कांद्याला २५००₹ क्विंटल प्रमाणे भाव द्या १२) शेतकरी असंघटित कामगार यांना १००००₹ पेन्शन सन्मान धन द्या आदीं ठरावांचा समावेश आहे.


No comments:

Post a Comment

महाविकास आघाडीच्या वैशाली दरेकर यांचा उमेदवारी अर्ज कल्याण लोकसभा मतदारसंघातून दाखल !!

महाविकास आघाडीच्या वैशाली दरेकर यांचा उमेदवारी अर्ज कल्याण लोकसभा मतदारसंघातून दाखल !! ** आदित्य ठाकरे यांचा रॅलीत सहभाग, जितेंद्र आव्हाड व ...