Monday 30 May 2022

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेत मा. सह आयुक्त यांनी अधिकारी, कर्मचारी व मुंबईकरांना दिली तंबाखूमुक्तीची शपथ - "तंबाखूला नाही म्हणा" !!

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेत मा. सह आयुक्त यांनी अधिकारी, कर्मचारी व  मुंबईकरांना दिली तंबाखूमुक्तीची शपथ - "तंबाखूला नाही म्हणा" !!


मुंबई, (शांताराम गुडेकर) :

         "जागतिक तंबाखू विरोधी दिन" निमित्ताने बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य समिती, कामगार विभाग व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, ३० मे २०२२ रोजी या प्रचार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे मा. मिलिन सावंत, सह आयुक्त, सामान्य प्रशासन, कामगार विभाग व मा. सहदेव मोहिते, प्रमुख कामगार अधिकारी यांच्या हस्ते सदर भव्य व्यसनमुक्ती पोस्टर्स प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. 


याप्रसंगी बृहन्मुंबई महानगरपालिका सह आयुक्त, सामान्य प्रशासन कामगार विभाग यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मुंबईकरांना संदेश दिला की, 31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिन या दिवसाचे महत्त्व आज मोठ्या स्वरुपात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिला आहे की, जर तंबाखूचे व्यसन थांबविले नाही तर सन 2020 ते 2030 पर्यंत जगातील सुमारे शंभर कोटी लोक तंबाखू पासून होणाऱ्या रोगांमुळे मृत्यू पावतील. त्यामध्ये 20 ते 30 वर्षे वयोगटातील 40 टक्के लोक असू शकतात. हा तंबाखूचा अतिरेकी हल्ला नाही का ? म्हणून या आयोजनात सर्वांनी सहभागी होऊन स्वतःला तंबाखू पासून दूर ठेवण्याची शपथ उपस्थित आधिकारी व कर्मचारी यांना व्यसनमुक्तीची शपथ त्यांनी दिली.


या अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. मुंबई तंबाखूमुक्त करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य समिती यांच्याद्वारे 31 मे पासून मुंबईत मोठ्या प्रमाणात तंबाखूमुक्त अभियान राबविण्यात येत असून यासाठी मुंबईतील सर्व महानगरपालिकेमध्ये याच प्रकारची सामूहिक तंबाखू मुक्तीची शपथ अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात येऊन तंबाखू मुक्त जीवन जगण्याचा संकल्प करण्यात येणार असल्याचे सांगितले. 


महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे ज्यांनी 2011साली व्यसनमुक्तीचे धोरण बनवले आहे. 2020 महाराष्ट्र राज्याचे साठावे वर्ष आहे. महानगरपालिका तसेच महाराष्ट्र सरकारने या निमित्ताने व्यसनमुक्त महाराष्ट्र च्या दिशेने पाऊल उचलावे असे आवाहन नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांनी केले. तसेच येणाऱ्या वर्षात शाळा, महाविद्यालये, हॉस्पिटल्स, धार्मिक स्थळे यांच्या 100 मीटर पासून तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री बंद व्हावी या संदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती कायदा अंमलबजावणीची मोहीम नगरपालिका, नगरपरिषद यामध्ये मोहीम राबविण्यात येईल अशी माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली. नशाबंदी मंडळाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत याठिकाणी तंबाखू मुक्ती ची शपथ मंडळाच्या संघटकांच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणार असल्याचे सरचिटणीस यांनी मांडले. 


वाढते व्यसनांचे प्रमाण आणि त्यात अडकत झालेली तरुणाई यांना व्यसनांपासून मुक्त करण्यासाठी व्यसनांचे शरीरावर होणारे दुष्परिणाम आणि शरीराची होणारी परवड लक्षात घेऊन या मुलांना परावृत्त करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमात तंबाखूचा राक्षस प्रदर्शनी मांडण्यात आली होती. 


ही प्रदर्शनी बघण्यासाठी येणारे कर्मचारी, अधिकारी व मुंबईकर यांचे लक्ष वेधुन घेऊन सर्वांना तंबाखूला नाही म्हणा असे संदेश देत होते. सदर कार्यक्रमाला बृहन्मुंबई महानगरपालिका, कामगार विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, सलाम मुंबई फाऊंडेशन, प्रजापिता ब्रह्मकुमारी, किन्नर मा या संस्थांनी सहभाग घेऊन कार्यक्रमात पोस्टर प्रदर्शनीचे आयोजन करून व्यसनमुक्तीचा संदेश दिला. तंबाखूजन्य कायद्याची माहिती दर्शविणारे कटआऊट, प्रदर्शनी, पोस्टर्स, पत्रकांच्या माध्यमातून तंबाखूजन्य पदार्थ व विक्री कायदा २००३ चा प्रचार, प्रसार व अंमलबजावणीसाठी आयोजित या कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी आपला सहभाग नोंदवत तंबाखू मतलब खल्लास तंबाखू मुक्त मुंबई महाराष्ट्र चा नारा देत तंबाखूजन्य पदार्थ पासून दूर राहण्याचा संकल्प केला अशी माहिती नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास व चिटणीस अमोल स. भा. मडामे यांनी दिली. सदर कार्यक्रमात नशाबंदी मंडळाच्या वतीने पालघर जिल्हा संघटक मिलिंद पाटील, मुंबई शहर संघटक रवींद्र गमरे, प्रियांका सवाखंडे व मुंबई उपनगर संघाटिका दिशा कळंबे या सर्वांनी उपस्थिती दर्शवुन कार्यक्रम पार पाडला.

No comments:

Post a Comment

महाविकास आघाडीच्या वैशाली दरेकर यांचा उमेदवारी अर्ज कल्याण लोकसभा मतदारसंघातून दाखल !!

महाविकास आघाडीच्या वैशाली दरेकर यांचा उमेदवारी अर्ज कल्याण लोकसभा मतदारसंघातून दाखल !! ** आदित्य ठाकरे यांचा रॅलीत सहभाग, जितेंद्र आव्हाड व ...