Tuesday 31 May 2022

यूपीएससी परीक्षेत संगमेश्वर तालुक्यातील वांझोळे गावचा चेतन पंदेरे चमकला !!

यूपीएससी परीक्षेत संगमेश्वर तालुक्यातील वांझोळे गावचा चेतन पंदेरे चमकला !!


मुंबई, (शांताराम गुडेकर) :
          नुकताच यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून रत्नागिरी जिल्हामधील संगमेश्वर तालुक्यातील वांझोळे गावाचे चेतन पंदेरे आयपीएस अधिकारी झाले आहेत.संगमेश्वर तालुक्यातील वांझोळेसारख्या खेडेगावातून पुढे येऊन शिक्षण घेतलेल्या चेतन पंदेरे यांनीही युपीएसी परीक्षेत ४१६ वी रँक घेत बाजी मारली आहे. युपीएससीमधून ते आयपीएस अधिकारी झाले असून त्यांच्या यशाचे विशेष कौतुक होत आहे.चेतन पंदेरे यांचे वडील नितीन सीताराम पंदेरे हे रत्नागिरी पोलीस खात्यात सेवेत सहाय्य्क पोलीस निरीक्षक आहेत.चेतन पंदेरे यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण रत्नागिरीतील कॉन्हेन्ट स्कूलमध्ये घेतले. त्यांनतर गोगटे- जोगळेकर महाविद्यालयातून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले.पुढे मुंबईतील आयसीसी कॉलेजमधून केमिकल इंजिनियरिंगची पदवी घेतली. त्याने रोज दिवसातून १० ते ११ तास अभ्यास केल्याने हे यश प्राप्त केले आहे. ४ वर्ष मेहनत घेत चेतन पंदेरे हे वयाच्या २५ व्या वर्षी आयपीएस अधिकारी झाले आहेत.त्यांच्या या यशामुळे त्याचे व त्याचे आईवडील श्री.व सौ. पंदेरे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

महाविकास आघाडीच्या वैशाली दरेकर यांचा उमेदवारी अर्ज कल्याण लोकसभा मतदारसंघातून दाखल !!

महाविकास आघाडीच्या वैशाली दरेकर यांचा उमेदवारी अर्ज कल्याण लोकसभा मतदारसंघातून दाखल !! ** आदित्य ठाकरे यांचा रॅलीत सहभाग, जितेंद्र आव्हाड व ...