Monday, 30 May 2022

कुणबी समाजोन्नती संघ मुंबई (रजि.) शाखा विक्रोळी -घाटकोपर तर्फे महत्वपूर्ण सभा संपन्न

कुणबी समाजोन्नती संघ मुंबई (रजि.) शाखा विक्रोळी -घाटकोपर तर्फे महत्वपूर्ण सभा संपन्न 


मुंबई (शांताराम गुडेकर ) :
कुणबी समाजोन्नती संघ मुंबई (रजि.) शाखा विक्रोळी -घाटकोपर तर्फे रविवार  दि.२९ मे  २०२२ रोजी संत तुकाराम बालवाडी, डगलाईन, राम नगर अ,घाटकोपर पश्चिम येथे विक्रोळी- घाटकोपर शाखेची महत्वाची सभा पार पडली. 


या सभेत शाखा वार्षिक जमाखर्च अहवाल सादर करण्यात आला.त्या अहवालाला चांगला प्रतिसाद  लाभला आणि सर्व सहमताने पास करण्यात आला त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले. याशिवाय काही पदाधिकारी मुंबई बाहेर रहायला गेले तर काही पदाधिकारी यांची आरोग्य समस्या निर्माण झाल्यामुळे ते शाखा सभा, अन्य कार्यक्रम यामध्ये आपले योगदान मनात असूनही देऊ शकत नव्हते. 


त्यामुळे शाखा कार्यकारणीचा विस्तार करणे आवश्यक होते.त्यानुसार सन २०२२-२३ साठी घाटकोपर -विक्रोळी शाखा पदाधिकारी विस्तार करण्यात आला. 


सन २०२२-२३ ची शाखा कार्यकारिणीमध्ये शाखा संस्थापक- आत्माराम बाईत, शाखा अध्यक्ष -सोनू रामचंद्र शिवगण, उपाध्यक्ष -वसंत राऊत, सदाशिव खांडेकर, शंकर मेणे, दत्ताराम थोरे, सेक्रेटरी- सुरेश मांडवकर, उपसेक्रेटरी -दिलीप बेलकर, सूर्यकांत सरफळे, अरविंद हरमळे, रमाकांत शिगवण, खजिनदार- चंद्रकांत भोज, उपखजिनदार -संतोष रांबडे, हिशोब तपासनीस -राजेश बने, संघ प्रतिनिधी- प्रकाश वालम, संघ कार्यकारिणी सदस्य -संजय जाधव, गणपत काजारे यांचा समावेश आहे. सर्व नवनिर्वाचित कार्यकारिणी यांचे सर्व आजी -माजी पदाधिकारी, सदस्य आणि सभासद यांच्यातर्फे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. या सभेला शाखा पदाधिकारी, सदस्य आणि सभासद, युवक मंडळ, महिला मंडळ, विवाह मंडळ पदाधिकारी, सदस्य आणि सभासद मोठया संख्येने उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...